नगरचे सौरभ बोरा तिरूपती देवस्थानचे सदस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:26 IST2021-09-17T04:26:06+5:302021-09-17T04:26:06+5:30
अहमदनगर : आंध्रप्रदेश सरकारने तिरूमला तिरूपती देवस्थानच्या नूतन अध्यक्ष व २८ सदस्यांची घोषणा केली आहे. त्या २८ सदस्यांमध्ये नगरचे ...

नगरचे सौरभ बोरा तिरूपती देवस्थानचे सदस्य
अहमदनगर : आंध्रप्रदेश सरकारने तिरूमला तिरूपती देवस्थानच्या नूतन अध्यक्ष व २८ सदस्यांची घोषणा केली आहे. त्या २८ सदस्यांमध्ये नगरचे सुपुत्र, उद्योजक सौरभ बोरा यांचा समावेश झाला आहे. या निवडीने नगरमध्ये व्यापारी, नातेवाईक, नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
उद्योजक असलेले सौरभ बोरा हे तिरूपती बालाजीचे भक्त आहेत. ते सध्या मुंबई येथे स्थायिक आहेत. विविध सामाजिक कामांत ते सतत सहभागी असतात. त्यांची तिरूमला तिरूपती देवस्थानच्या सदस्यपदी निवड झाल्याची बातमी गुरुवारी सकाळी कळली. त्यांच्या या निवडीचे वृत्त समजताच शहरात सोशल मीडियावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.
आंध्र प्रदेश सरकारने १५ सप्टेंबरला काढलेल्या अध्यादेशाद्वारे बोरा यांची नियुक्ती करण्यात आली. बोरा यांच्यासमवेत महाराष्ट्रातून मिलिंद केशव नार्वेकर यांचाही समावेश आहे. सौरभ बोरा हे मर्चंट बँकेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान संचालिका प्रमिला बोरा यांचे चिरंजीव आहेत.
--
फोटो- १६ सौरभ बोरा