मेहर लहारे नगरसचिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:04 IST2021-01-08T05:04:50+5:302021-01-08T05:04:50+5:30

विद्युत साहित्य वाटप सुरू अहमदनगर: महापालिकेच्या विद्युत विभागाकडून खरेदी करण्यात आलेले विद्युत साहित्याचे प्रभागनिहाय वाटप सुरू करण्यात आले आहे. ...

Mehr Lahare Municipal Secretary | मेहर लहारे नगरसचिव

मेहर लहारे नगरसचिव

विद्युत साहित्य वाटप सुरू

अहमदनगर: महापालिकेच्या विद्युत विभागाकडून खरेदी करण्यात आलेले विद्युत साहित्याचे प्रभागनिहाय वाटप सुरू करण्यात आले आहे. विद्युत विभागाकडून हे दिवे बसविण्यात येणार असल्याने प्रभाग उजळणार आहेत.

..

वॉल्व्हमनची मुदत संपली

अहमदनगर: महापालिकेने येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून कंत्राटी तत्त्वावर भरती केलेल्या वॉल्व्हमनची मुदत संपली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा विभागात वॉल्व्हमनची कमतरता निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम नियमित सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर होणार आहे.

...

ऑनलाइन शपथ

अहमदनगर: राज्य शासनाच्या वसुंधरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शपथ घेण्यात आली. महापालिकेच्यावतीने उद्यान विभागाचे यू.जी. म्हसे व पर्यावरणप्रेमी सुरेश खामकर हे या यावेळी उपस्थित होते.

....

तपोवन रस्त्यावर कचऱ्याचे ढीग

अहमदनगर: महापालिकेच्यावतीने स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले असले तरी येथील तपोवन रस्त्यावरील भिस्तबाग महाल परिसरात सर्रास कचरा टाकला जात आहे. त्यामुळे या भागात कमालीची दुर्गंधी पसरली आहे. याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दर्लक्ष होत आहे.

...

Web Title: Mehr Lahare Municipal Secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.