कुकडीच्या आवर्तनासाठी नऊ एप्रिलला पुण्यात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:22 IST2021-04-02T04:22:08+5:302021-04-02T04:22:08+5:30
श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन सोडण्यासाठी नऊ एप्रिलला पुण्यात बैठक आयोजित केल्याची माहिती माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली. ...

कुकडीच्या आवर्तनासाठी नऊ एप्रिलला पुण्यात बैठक
श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन सोडण्यासाठी नऊ एप्रिलला पुण्यात बैठक आयोजित केल्याची माहिती माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली. कुकडीचे आवर्तन सोडण्यासाठी त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे. त्यात चालढकल खपवून घेणार नाही. पाण्याची गरज व मागणी लक्षात घेऊन पुढील आवर्तनाचा निर्णय त्वरित घेतला जावा, यासाठी आपण सरकारचे वारंवार लक्ष वेधले होते. आता पुण्यात या संदर्भात बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यात आवर्तनाचा विषय मार्गी लागेल. पाण्याची उपलब्धता व वापर याबाबत श्रीगोंद्यावर अन्याय होणार नाही, याची लोकप्रतिनिधी म्हणून दक्षता घेतली जाईल, असे पाचपुते यांनी सांगितले. विसापूर कालव्याखालील शेतकऱ्यांना पाणी मिळावे या मागणीसाठी ५ एप्रिलला श्रीगोंद्यात कुकडी विश्रामगृहावर बैठक आयोजित केली आहे. तीत पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल. घोडद्वारे नदीवरील बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी आपण यापूर्वी केली होती, असे त्यांनी सांगितले.