मनपाची सभा मागील इतिवृत्तांनी गाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:15 IST2021-06-11T04:15:43+5:302021-06-11T04:15:43+5:30

अहमदनगर : महापालिकेच्या मागील २०१८ पासूनच्या सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त कायम करण्याचा विषय शुक्रवारी (दि.११) होणाऱ्या सभेसमोर आहे. हे इतिवृत्त ...

The meeting of the corporation will be announced in the previous minutes | मनपाची सभा मागील इतिवृत्तांनी गाजणार

मनपाची सभा मागील इतिवृत्तांनी गाजणार

अहमदनगर : महापालिकेच्या मागील २०१८ पासूनच्या सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त कायम करण्याचा विषय शुक्रवारी (दि.११) होणाऱ्या सभेसमोर आहे. हे इतिवृत्त कायम करण्यावरून ही सभा गाजण्याची शक्यता आहे.

महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी महापालिकेची ऑनलाइन सर्वसाधारण सभा होत आहे. मागील ऑगस्ट २०१८ पासूनचे ५ इतिवृत्त कायम करण्यासह पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील फाउंडेशन संचालित विळदघाट येथील संस्थेस पाणीपट्टी अकारणे, सावेडी उपनगरात आयुर्वेद परिचय केंद्र उभारणे, नालेगाव येथील जागा सकल मराठा समाजास देणे हे विषय सभेसमोर आहेत. महापौर वाकळे यांचा कार्यकाल येत्या ३० जून रोजी संपुष्टात येत आहे. निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यादृष्टीने या सभेला महत्त्व प्राप्त झाले असून, मागील सभेतील इतिवृत्त कायम करताना शिवसेना काय भूमिका घेते, याचीच उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

Web Title: The meeting of the corporation will be announced in the previous minutes