भैरवनाथ मंदिरातील सप्ताह काळात मटण दुकाने बंद
By | Updated: December 7, 2020 04:15 IST2020-12-07T04:15:27+5:302020-12-07T04:15:27+5:30
पारनेर : पारनेरचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात हरिनाम सप्ताह सुरू असल्याने पारनेर शहरातील सर्व मटण विक्री दुकानदारांनी आणि मुस्लिम समाजाने ...

भैरवनाथ मंदिरातील सप्ताह काळात मटण दुकाने बंद
पारनेर : पारनेरचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात हरिनाम सप्ताह सुरू असल्याने पारनेर शहरातील सर्व मटण विक्री दुकानदारांनी आणि मुस्लिम समाजाने मटण विक्री बंद ठेवून सामाजिक एकोप्याने दर्शन घडवले आहे.
पारनेर शहरात ग्रामदैवत भैरवनाथ देवस्थानच्या मंदिरात हरिनाम सप्ताह सुरू झाल्यावर मांसाहार बंद केला जातो, तसेच कल्याण कृतिका नक्षत्रातसुद्धा पंधरा दिवस मांसाहार बंद ठेवला जातो. यात मटण दुकानदार, मुस्लिम समाजातील मटण दुकानदारही दुकाने बंद ठेवून या सामाजिक एकोप्यात सहभागी होत असतात. मुस्लिम धर्मीय यांच्या विविध कार्यक्रमात हिंदुधर्मीयांचा सहभाग असतो. त्यामुळे सातत्याने एकोपा जपण्याची परंपरा कायम आहे. पारनेर शहरात सामुदायिक सदभावना पाळली जात असल्याचे आनंद मेडिकल फाऊंडेशनचे डॉ. सादिक राजे, मुजाहिद सय्यद, आयाज तांबोळी, राजू शेख यांनी सांगितले.