शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर अधिवेशनानंतर महापौर बदल?

By admin | Updated: December 11, 2014 00:37 IST

अहमदनगर : महापौर असलेले संग्राम जगताप यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडल्याने सुरूवातीच्या काळात सुरू झालेली महापौर बदलाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

अहमदनगर : महापौर असलेले संग्राम जगताप यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडल्याने सुरूवातीच्या काळात सुरू झालेली महापौर बदलाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर महापालिकेत राजकीय खांदेपालट होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. जगताप समर्थकांनी मात्र या बदलाबाबत बोलण्यास नकार दिला असून राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या गोटातून बदलास दुजोरा दिला. डिसेंबर २०१३ मध्ये महापालिकेची निवडणूक झाली. राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा मिळवत नगरसेवकांची मोट बांधण्यात यश मिळवत सत्ता स्थापन केली. संग्राम जगताप यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा महापौर पदाची माळ पडली. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या. विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली. त्यानंतर लगेचच जगताप राजीनामा देणार, नवीन महापौर शहराला मिळणार याची चर्चा सुरू झाली. पण खुद्द संग्राम जगताप यांनीच असा कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट करत ‘घाई करू नका’ असा पक्षश्रेष्ठींचा निरोप असल्याचे समर्थकांना सांगितले. त्यामुळे बदलाची चर्चा थंडावली. आता पुन्हा ही चर्चा जोर धरू लागली आहे. संग्राम जगताप हे महापौर पदाचा राजीनामा देणार असून अभिषेक कळमकर यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत आमदार अरुण जगताप यांची माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती मिळाली. त्यांनीही अधिवेशनानंतर पाहू असे म्हटल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यासंदर्भात अरुण जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही. आमदार अरुण जगताप यांची अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती आहे. पण चर्चेचा तपशील समजू शकला नाही, अशी माहिती माजी जिल्हाध्यक्ष दादा कळमकर यांनी दिली. (प्रतिनिधी)