नगराध्यक्षा आदिक यांच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST2021-07-23T04:14:03+5:302021-07-23T04:14:03+5:30

श्रीरामपूर : नगरपालिकेतील कर्मचारी व माजी नगरसेवक रमजान शहा यांच्यात झालेल्या वादामध्ये नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी मध्यस्थी केली. दोघांनीही ...

Of Mayor Adik | नगराध्यक्षा आदिक यांच्या

नगराध्यक्षा आदिक यांच्या

श्रीरामपूर : नगरपालिकेतील कर्मचारी व माजी नगरसेवक रमजान शहा यांच्यात झालेल्या वादामध्ये नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी मध्यस्थी केली. दोघांनीही घटनेवर दिलगिरी व्यक्त केल्याने वादावर पडदा पडला.

पालिकेच्या जन्म मृत्यू विभागातील कर्मचारी ज्ञानेश्वर चव्हाण व रमजान शहा यांच्यात जन्म दाखल्यातील नावात झालेल्या चुकीवरून वाद झाला होता. त्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी दिवसभरासाठी काम बंद आंदोलन केले होते. मात्र प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले नाही. नगराध्यक्षा आदिक व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी बुधवारी पालिकेत बैठक घेतली. चव्हाण व शहा यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर यशस्वी मध्यस्थी केली. या वादावर पडदा पडला.

दीपक चव्हाण, नगरसेवक राजेंद्र पवार, मुक्तार शहा, रईस जहागीरदार, अल्तमश पटेल, साजिद मिर्झा, तौफिक शेख, रोहित शिंदे, अनिल इंगळे, फयाज कुरेशी आदी उपस्थित होते.

---------

Web Title: Of Mayor Adik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.