श्रीगोंद्यातील शिक्षक मावळ्याने केले १०० किल्ले सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:30 IST2021-02-05T06:30:25+5:302021-02-05T06:30:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क श्रीगोंदा : तालुक्यातील खांडगाव येथील प्राथमिक शिक्षक राजेश इंगळे यांनी शिवदुर्ग ट्रेकर्सच्या माध्यमातून गड ...

Mavalya, a teacher from Shrigonda, built 100 forts, sir | श्रीगोंद्यातील शिक्षक मावळ्याने केले १०० किल्ले सर

श्रीगोंद्यातील शिक्षक मावळ्याने केले १०० किल्ले सर

लोकमत न्यूज नेटवर्क

श्रीगोंदा : तालुक्यातील खांडगाव येथील प्राथमिक शिक्षक राजेश इंगळे यांनी शिवदुर्ग ट्रेकर्सच्या माध्यमातून गड किल्ले पाहण्याचे वेड अनेकांना लावले. राजेश इंगळे यांनी रायगड किल्ल्यावर छत्रपती

शिवाजी महाराजांच्या पायाची धूळ मस्तकी लावून किल्ला सर करण्याच्या मोहिमेस सुरुवात केली होती. विश्रामगड किल्ला चढून राजेश इंगळे यांनी किल्ले सर करण्याची शंभरावी साजरी केली आहे. याचा आनंद राजेश इंगळे यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे.

राजेश इंगळे यांनी रतनगड, पट्टा किल्ला, कळसुबाई, हरिहर, रामशेज, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, धर्मविरगड, रायगड, राजगड, लोहगड, कुलाबा ,कोर्लई, वर्धनगड, सिंहगड, रोहिडा, सुधागड, वसंतगड, चावंड, शिवनेरी, हडसर, निमगिरी हनुमंतगड, कोथळीगड, प्रबळगड, कलावंतीणदुर्ग, हरिश्चंद्रगड, अहमदनगर भुईकोट, उंदेरी, खांदेरी, तिकोणा, रत्नदुर्ग, जयगड, दौलतमंगल, मल्हारगड, सांदणव्हॅली, तुंग, कोरीगड, रायरेश्वर, खर्डा, भोरगिरी, सज्जनगड, कास पठार, नळदुर्ग, तोरणा, वासोटा, चंदन-वंदनगड, केंजळगड, घणगड, सरळगड, पदमदुर्ग, जंजिरा, अवचितगड, बिरवाडी, मानगड, तळागड, घोसाळगड, संतोषगड, प्रतापगड, पन्हाळा यासारख्या अनेक किल्ल्यांची भटकंती केली.

रायगड जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा करीत असताना राजेश इंगळे यांना किल्ले पाहून अभ्यास करण्याचा छंद लागला. त्यानंतर त्यांनी श्रीगोंद्यात शिवदुर्ग ट्रेकर्सच्या माध्यमातून गड किल्ले पाहणारा परिवार निर्माण केला आहे.

शिवदुर्ग परिवार भटकंती सोबत प्लॅस्टिक कचरा स्वच्छता अभियान राबविणे, गड पूजन करणे, छत्रपती शिवरायांच्या सरदारांच्या वंशजांची भेट घेणे, ऐतिहासिक वारसा भेट, समाधी वंदन करणे, इतिहासाच्या पाऊलखुणा शोधणे, ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन इत्यादी कार्य करतात. अनेक वारसा स्थळांना भेटी देण्याची कामगिरी त्यांनी केली आहे.

.....

शिवप्रेमींनी किल्ले अगोदर पाहिले तर त्यांना छत्रपती शिवरायांचे अलौकिक कार्य, गड-कोटांचा वारसा माहिती होईल. ते किल्ले संवर्धनाकडे वळतील. त्यासाठी शिवदुर्ग ट्रेकर्सच्या माध्यमातून चळवळ उभी करत आहे.

- राजेश इंगळे, अध्यक्ष, शिवदुर्ग ट्रेकर्स, श्रीगोंदा.

...

फोटो-२५राजेश इंगळे किल्ला

..

ओळी-श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव येथील प्राथमिक शिक्षक राजेश इंगळे किल्ला सर करताना.

Web Title: Mavalya, a teacher from Shrigonda, built 100 forts, sir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.