नेवाशातील आषाढी वद्य एकादशीचा माउलींचा यात्रौत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:22 IST2021-07-31T04:22:40+5:302021-07-31T04:22:40+5:30
नेवासा : आषाढी वद्य एकादशीला माउलींची कर्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात होणारा यात्रा उत्सव यंदाही ...

नेवाशातील आषाढी वद्य एकादशीचा माउलींचा यात्रौत्सव रद्द
नेवासा : आषाढी वद्य एकादशीला माउलींची कर्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात होणारा यात्रा उत्सव यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय विश्वस्त मंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे यावर्षीही आषाढी वद्य वारी वारकऱ्यांविनाच होणार आहे.
आषाढी वद्य कामिका एकादशीला दरवर्षी येथे लाखो भाविक पैस खांब दर्शनासाठी येतात. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून या बैठकीचे आयोजन शुक्रवारी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणातील सभागृहात करण्यात आले होते.
यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख मार्गदर्शक शिवाजी महाराज देशमुख, विश्वस्त मंडळाचे माजी अध्यक्ष ॲड. माधवराव दरंदले, अध्यक्ष पांडुरंग अभंग, विश्वस्त विश्वास गडाख, ज्ञानेश्वर शिंदे, रामभाऊ जगताप, भिकाजी जंगले, पोलीस निरीक्षक विजय करे, नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड, उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, सतीश पिंपळे, आसिफ पठाण, नगरपंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक अधिकारी रवींद्र गुप्ता, विश्वस्त कृष्णा पिसोटे, कैलास जाधव, गजानन दरंदले, शिवा राजगिरे, जालिंदर गवळी, भैय्या कावरे, संदीप आढाव, भाऊराव सोमुसे उपस्थित होते.
300721\img-20210730-wa0031.jpg
नेवासा : आषाढी वद्य एकादशीला माऊलींची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात झालेल्या बैठकीप्रसंगी बोलतांना हभप शिवाजी महाराज देशमुख