शहरातील चौकांचा मास्टर प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:16 IST2021-06-25T04:16:43+5:302021-06-25T04:16:43+5:30

............... काँग्रेस उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत अहमदनगर : महापालिकेच्या महापौर निवडणुकीसाठी सेना व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली. महाविकास ...

Master plan of city squares | शहरातील चौकांचा मास्टर प्लॅन

शहरातील चौकांचा मास्टर प्लॅन

...............

काँग्रेस उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत

अहमदनगर : महापालिकेच्या महापौर निवडणुकीसाठी सेना व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली. महाविकास आघाडीत काँग्रेस घटक पक्ष आहे. विश्वासात न घेतल्याने काँग्रेसमधून नाराजी व्यक्त होत असून, महापौर निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी काँग्रेसने चालविली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांच्या पत्नी शीला चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता आहे.

.....

भाजपला चमत्काराची अपेक्षा

अहमदनगर : महापौर निवडणुकीसाठी सेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. परंतु, ऐनवेळी चमत्कार होईल, अशी अपेक्षा भाजपला आहे. महापालिकेत काय भूमिका घ्यायची याबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी पक्ष कार्यालयात बैठक बोलविण्यात आली होती. या बठकीत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असून, या बैठकीत महापौर निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Master plan of city squares