लग्न, जागरण गोंधळ महागात पडले; पोलिसांनी केली दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 16:29 IST2021-02-27T16:29:14+5:302021-02-27T16:29:58+5:30
अकोले तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लग्न, जागरण गोंधळ समारंभात गर्दी केली म्हणून रूंभोडी, इंदोरीत दोन विवाह सोहळ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. यावेळी पोलिसांनी दहा हजार रुपये दंड वसूल केला.

लग्न, जागरण गोंधळ महागात पडले; पोलिसांनी केली दंडात्मक कारवाई
अकोले: तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लग्न, जागरण गोंधळ समारंभात गर्दी केली म्हणून रूंभोडी, इंदोरीत दोन विवाह सोहळ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. यावेळी पोलिसांनी दहा हजार रुपये दंड वसूल केला.
गेली आठ-दहा दिवसात विनामास्क व्यक्तींविरुद्ध शंभर रुपये दंडाच्या नगरपंचायत प्रशासनाने २५१ तर पोलिसांनी २८६ कारवाया केल्या. लग्नात ५० पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्याने दोन ठिकाणी कारवाया, करून प्रत्येकी दहा हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. अकोले शहरातील एका पावभाजी सेंटरवरही कारवाई करण्यात आली. हॉटेल चालकास अडीच हजार रुपये भुर्दंड सोसावा लागला.
तहसीलदार मुकेश कांबळे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी, पोलीस निरीक्षक अभय परमार, पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमणे, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह महसूल, नगरपंचायत, पंचायत समिती, आरोग्य, पोलीस व गावोगावी ग्रामपंचायत प्रशासन रस्त्यावर उतरून कारवाई करत आहे.