२० लाखांसाठी विवाहितेचा छळ
By Admin | Updated: July 14, 2014 00:57 IST2014-07-14T00:29:31+5:302014-07-14T00:57:19+5:30
अहमदनगर : माहेरावरून २० लाख रुपये आणावेत यासाठी छळ केल्याप्रकरणी अश्विनी विशाल पाटील (वय २५, रा. भिडे चौक, सावेडी) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२० लाखांसाठी विवाहितेचा छळ
अहमदनगर : प्लॉट घेण्यासाठी माहेरावरून २० लाख रुपये आणावेत यासाठी छळ केल्याप्रकरणी अश्विनी विशाल पाटील (वय २५, रा. भिडे चौक, सावेडी) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्विनी पाटील या मूळ राहणार औरंगाबादच्या असून त्या सध्या नगर येथे राहत आहेत. प्लॉट घेण्यासाठी माहेरावरून २० लाख रुपये आणावेत, यासाठी पती विशाल हंसराज पाटील, विद्या हंसराज पाटील, हंसराज भाऊराव पाटील (रा. प्राची कॉम्प्लेक्स, कोकणवाडी, औरंगाबाद) यांनी अश्विनीचा छळ केला. पतीसोबत पुणे आणि नगर येथे नांदत असताना हा छळ झाला आहे. शारीरिक, मानसिक छळ करून क्रूर वागणूक दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे. (प्रतिनिधी)