विवाहितेचा छळ; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST2021-07-07T04:27:05+5:302021-07-07T04:27:05+5:30
हरिदास चांगदेव जाधव (पती), चांगदेव नामदेव जाधव (सासरा), गया चांगदेव जाधव (सासू), अमोल चांगदेव जाधव (दीर, सर्व रा. मांडवे ...

विवाहितेचा छळ; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
हरिदास चांगदेव जाधव (पती), चांगदेव नामदेव जाधव (सासरा), गया चांगदेव जाधव (सासू), अमोल चांगदेव जाधव (दीर, सर्व रा. मांडवे खुर्द, ता. पारनेर), सीताराम नामदेव जाधव (चुलत सासरा), सुषमा सीताराम जाधव (चुलत सासू), सीमा सीताराम जाधव (चुलत नणंद, सर्व रा. मधुबन आयुर्वेदालय, ओंकारनगरी बिल्डींग, पहिला मजला, नारायणगांव, ता. जुन्नर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
प्रज्ञा हरिदास जाधव (वय २३, रा. मांडवे खुर्द, ता. पारनेर, हल्ली रा. सारोळेपठार, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ ऑगस्ट २०२० नंतर सुमारे १० ते १५ दिवसांपासून ते १५ नोव्हेंबर २०२० पर्यंत प्रज्ञा या मांडवे खुर्द येथे सासरी नांदत असताना, माहेरहून गाडी खरेदी करण्यासाठी पाच लाख रुपये आणावेत, यासाठी त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करत त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले, असे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले अधिक तपास करीत आहेत.