मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सामूहिक नेतृत्व गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:17 IST2021-06-02T04:17:40+5:302021-06-02T04:17:40+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मंगळवारी (दि. ०१) राहाता तालुक्यातील लोणी गावात बैठक झाली. मराठा आरक्षणासाठी आमदार विखे हे अहमदनगर ...

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सामूहिक नेतृत्व गरजेचे
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मंगळवारी (दि. ०१) राहाता तालुक्यातील लोणी गावात बैठक झाली. मराठा आरक्षणासाठी आमदार विखे हे अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांचा दौरा करत बैठका घेत आहेत. दरम्यान मंगळवारी ते संगमनेरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
विखे म्हणाले, मराठा समाज आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. या सरकारमधील मंत्री आता मोर्चे काढायला लागले. त्यामुळे सरकारबद्दल विश्वासहर्ता समाजामध्ये राहिलेली नाही. लोणीत झालेल्या बैठकीत काही मुद्दे केंद्र सरकारशी संबंधित आहे. असे मानले गेले. म्हणून पहिल्या टप्प्यात पुढील दहा दिवसांमध्ये मराठा समाजाचे सर्व आमदार, खासदारांची बैठक मुंबईला बोलवावी. मराठा समाजाच्या सर्व संघटना यावेळी उपस्थित राहतील. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन या प्रमुख मागणीसाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारला पाहिजे. अशा प्रकारचा निर्णय लोणीतील बैठकीत झाला आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे, शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, नरेंद्र पाटील यांनीही निमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच मराठा समाजातील सर्व मंत्री, आमदार, खासदार यांनी एकाच व्यासपीठावर आले पाहिजे. ही आजच्या बैठकीत प्रमुख भूमिका होती. आणि त्यावर सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले आहे.
-----------------
भविष्यातील रणनीती निश्चित
लोणी येथे राज्यातील बहुसंख्य मराठा संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मी सातत्याने एकत्र येण्याचे आवाहन करत आलो आहे. एकाच व्यासपीठावरून आता एकत्रितपणे आपल्याला सरकारवर दबाव आणण्याची आवशकता आहे. मला विशेष आनंद आहे की, याला राज्यातील बहुतांशी संघटना प्रतिसाद दिला असून त्यांचे प्रतिनिधी बैठकीला हजर होते. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासंदर्भात भविष्यातील रणनीती काय असावी, हे सुद्धा आज सगळ्यांच्या चर्चेनंतर निश्चित करण्यात आली आहे. असेही आमदार राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.