सावकारकीच्या विरोधातील मोहिमेमुळे सावरली अनेक कुटुंबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST2021-07-11T04:16:32+5:302021-07-11T04:16:32+5:30

कर्जत : पोलीस प्रशासनाच्या जामखेड-कर्जत तालुक्यातील सावकारकीच्या विरोधातील माेहिमेमुळे अनेक सर्वसामान्य कुटुंबे सावरली आहेत. पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, कर्जतचे ...

Many families have recovered from the campaign against lending | सावकारकीच्या विरोधातील मोहिमेमुळे सावरली अनेक कुटुंबे

सावकारकीच्या विरोधातील मोहिमेमुळे सावरली अनेक कुटुंबे

कर्जत : पोलीस प्रशासनाच्या जामखेड-कर्जत तालुक्यातील सावकारकीच्या विरोधातील माेहिमेमुळे अनेक सर्वसामान्य कुटुंबे सावरली आहेत.

पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी शोषित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी उपक्रम राबविले. त्यांचे नावीन्यपूर्ण उपक्रम हे जिल्ह्याला आदर्श ठरतील असेच आहेत. त्यातीलच एक म्हणजे सर्वसामान्य गोरगरीब, सावकारकीच्या पाशात रुतून गेलेल्या अनेक कुटुंबांचा फास ‘सैल’ करण्याचे आदर्श काम या अधिकाऱ्यांनी सुरू करून वेगळाच आदर्श घडविला आहे. अवैध सावकारीच्या प्रकरणात मुद्दलीपेक्षा दहापट व्याज देऊनही ती मूळ रक्कम देणे शक्य होत नाही. मग घरातील महागड्या वस्तू, वाहने, दागिने, जनावरे, प्रसंगी जमिनीही लिहून ताब्यात घेऊन त्या व्याजापोटी हडपण्याची अनेक प्रकरणे घडली आहेत. मात्र न्याय मिळत नसल्याने या सावकारकीच्या जाचाला कंटाळून आत्महत्येसारख्या घटना घडतात. मात्र आता सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी पोलीस यंत्रणेने सुरू केलेल्या या उपक्रमाला सर्वांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. कर्जत व जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेली सावकारकी मोडीत काढण्यासाठी नागरिकांनो, तुम्ही पुढे या पोलीस आपल्या मदतीसाठी कायम पाठीशी असतील तुम्हाला आम्ही संरक्षण देऊ हा विश्वास निर्माण केला आहे.

----

सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक थांबविण्यासाठी श्रीगोंदा, कर्जत, जामखेड तालुक्यात ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. लोकांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी यासाठी सोशल मीडियावर तसेच अनेक भागांत स्पिकर लावून प्रचार व प्रसार केला. आमदार रोहित पवारांचेही सहकार्य लाभत आहे.

-अण्णासाहेब जाधव,

पोलीस उपअधीक्षक

---

या मोहिमेमुळे अनेक प्रकरणे परस्पर तडजोडीमुळे मिटत आहेत. तक्रार देण्यासाठी न घाबरता पुढे येणे गरजेचे आहे. कुणाला कसलाही त्रास होणार याची पोलीस जबाबदारी घेतील.

-चंद्रशेखर यादव,

पोलीस निरीक्षक, कर्जत

------

तत्काळ लागणाऱ्या आर्थिक गरजेपोटी गोरगरीब नागरिक घाईगडबडीने इतर बाबींकडे लक्ष न देता सावकाराकडून पैसे घेतो. मात्र वर्षानुवर्षे रक्कम देऊनही मुद्दल तशीच राहते. लोकांना आवाहन करून विश्वास दिला. त्रास देणाऱ्या सावकारांवर गुन्हेही दाखल केले.

-संभाजी गायकवाड,

पोलीस निरीक्षक, जामखेड

Web Title: Many families have recovered from the campaign against lending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.