विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडीचा मंत्र

By Admin | Updated: June 3, 2016 23:23 IST2016-06-03T23:21:27+5:302016-06-03T23:23:24+5:30

अहमदनगर : बारावीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे, असा यक्षप्रश्न पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ वरदान ठरत आहे़

Mantra for students choosing the right career | विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडीचा मंत्र

विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडीचा मंत्र

अहमदनगर : बारावीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे, असा यक्षप्रश्न पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ वरदान ठरत आहे़ एकाच छत्राखाली करिअर निवडीची माहिती मिळत असल्याने विद्यार्थी व पालकांचा वेळ व पैशाची मोठी बचत झाली आहे़ या प्रदर्शनात येणारा प्रत्येक विद्यार्थी करिअर निवडीचा बहुपर्यायी साक्षात्कार घडल्याने आनंदित होत आहे़ संभ्रमातून बाहेर पडून योग्य करिअर निवडीचा मंत्र घेऊनच प्रत्येक जण समाधानी होऊन जात आहे़ विद्यार्थी आणि पालकांसाठी ‘लोकमत’ च्यावतीने प्रेमदान चौकातील गायकवाड सांस्कृतिक भवन येथे आयोजित ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’चा शुक्रवारी महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते शानदार शुभारंभ झाला़ यावेळी विखे फौंडेशनचे सचिव लेफ्टनंट जनरल (निवृत्त) बी़ सदानंदा, महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप गावडे, विखे फौंडेशनच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ एऩ एऩ कुदळ, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे प्रेमचंद मोरे, स्टेट बँक आॅफ इंडियाचे सहायक महाप्रबंधक प्रवीण करडे, के़ जी़ एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे वैभव हेंद्रे, ‘लोकमत’ नगर आवृत्तीचे सरव्यवस्थापक शिरीष बंगाळे, जि़डे़ चिंधे, एस़एम़ ठुबे, प्राचार्य राजकुमार देशपांडे आदी उपस्थित होते़ प्रारंभी ‘लोकमत’ नगर आवृत्तीचे संपादकीय प्रमुख सुधीर लंके यांनी शैक्षणिक प्रदर्शन आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली़ आयुक्त गावडे म्हणाले, दहावी, बारावीनंतर पुढे कोणते शिक्षण घ्यावयाचे, हा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे असतो़ शैक्षणिक प्रदर्शनात विद्यार्थी आणि पालकांना त्यांच्या प्रश्नांचे उत्तर मिळणार आहे़ विद्यार्थ्यांसह पालक आणि त्यांच्या नातेवाईकांनीही या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन गावडे यांनी केले़ प्राचार्य कुदळ म्हणाले, शासनाने बारावीनंतरच्या विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया बदलविली असून, विद्यार्थ्यांना याबाबत या प्रदर्शनातून माहिती मिळणार आहे़ करडे म्हणाले, उच्च व व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करत असताना पैशांची गरज भासत असते़ यासाठी स्टेट बँकेकडून शैक्षणिक कर्ज मिळते, त्याची माहिती विद्यार्थ्यांना प्रदर्शनातून मिळणार आहे़ उद्घाटन समारंभाला पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी) डॉ़ विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन मुख्य प्रयोजक तर केजेस एज्युकेशनल इन्स्टिट्यूट पुणे, द न्यू इंडिया एश्योरन्स कं. लि. व स्टेट बँक आॅफ इंडिया, या प्रदर्शनाचे असोसिएट स्पॉन्सर आहेत. तर रेडिओ सिटी हे रेडियो पार्टनर आणि निर्मल क्रिएशन हे आऊटडोअर पार्टनर आहेत. विविध एज्युकेशन संस्थांमध्ये अनेक प्रकारचे कोर्सेस उपलब्ध असतात़ मात्र, त्याबाबत वेळेत माहिती मिळत नाही़ अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरच्या माध्यमातून बारावीनंतर पुढे काय करता येईल, याबाबत खूप चांगली माहिती मिळाली़ शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींनी चांगल्या पद्धतीने माहिती समजावून सांगत उपलब्ध अभ्यासक्रमही सांगितले़ -वैभव मंडलिक, विद्यार्थी अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये एकाच ठिकाणी बहुतांशी शैक्षणिक संस्थांची माहिती मिळाली आहे़ बारावीनंतर पुढे काय करता येईल, असे अनेक पर्याय समजले आहेत़ विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त आहे़ बारावीनंतर बहुतांशी महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रकिया सुरू होते़ त्यामुळे या वेळेत होत असलेले हे प्रदर्शन उपयुक्त आहे़ -विवेक आवारी, विद्यार्थी आवडीच्या क्षेत्रात करिअर करत असताना चांगले महाविद्यालय, शुल्क, इतर सुविधा याबाबत माहिती घेणे गरजेचे ठरते़ या शैक्षणिक प्रदर्शनात विविध स्टॉलवर अपेक्षित अशी सर्व माहिती मिळाली़ त्यामुळे महाविद्यालय निश्चित करण्यास मदत होणार आहे़ - संदीप कानडे, विद्यार्थी नगर जिल्ह्यासह परिसरात अनेक कोर्सेस असलेल्या संस्था आहेत, हे या शैक्षणिक प्रदर्शनाच्या माध्यमातून समजले़ अगदी पुणे, मुंबई या ठिकाणी असलेले अभ्यासक्रमही येथेच उपलब्ध असल्याने पुढील शिक्षणासाठी दूर जाण्याची गरज भासणार नाही़ -राजबीर शाही, विद्यार्थी पाल्याने चांगले शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे रहावे, हे प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते़ दहावी-बारावीनंतर पुढे मुलांनी कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा आणि कोणता अभ्यासक्रम निवडावा, असे अनेक प्रश्न असतात़ या शैक्षणिक प्रदर्शनातून या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. - लता बुराडे, पालक बारावीनंतर पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना अनेक शंका मनात असतात़ आपण स्वत: प्रत्येक महाविद्यालयात जावून चौकशी करणे शक्य होत नाही़ या शैक्षणिक प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध झाली आहे़ -बाबासाहेब कर्डिले, पालक नगर शहरासह जिल्ह्यात आणि परिसरात अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांचे नावे ऐकली होती़ मात्र, तेथे जाता आले नाही़ या प्रदर्शनाच्या माध्यमातून या महाविद्यालयात शिकविले जाणारे अभ्यासक्रम आणि तेथील सुविधा याविषयी माहिती मिळाली आहे़ त्यामुळे हे प्रदर्शन पालकांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे़ -सविता आहेर, पालक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे फौंडेशन-इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंग उपलब्ध अभ्यासक्रम - जीएनएम- कालावधी- ३ वर्षे, पात्रता- १२ वी पास (सायन्स व आर्टस्). बेसिक बी. एस्सी. नर्सिंग- कालावधी- ४ वर्ष, पात्रता- १२ वी पास (सायन्स), एमएचटी-सीईटी -१६ कम्प्लसरी.पोस्ट बेसिक बी. एस्सी. नर्सिंग २ वर्ष, जी. एन. एम. व आर. जी. एन. एम. पास. कोर्स (डिग्री) पी. जी. प्रोग्राम एम. एस्सी. नर्सिंग- प्रोपोस्ड शिष्यवृत्तीची सुविधा व कमवा व शिका योजना राजीव गांधी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक ४मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानचे राजीव गांधी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग कर्जुले हर्या (टाकळी ढोकेश्वर) ची स्थापना २०१२ साली झाली. या अभियांत्रिकी महाविद्यालयात एकूण ७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयात एकूण ४ कोर्सेस् आहेत. इलेक्ट्रीकल, कॉम्प्युटर व इलेक्ट्रॉनिक व टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल शाखा आहेत. याबरोबरच संस्थेमध्ये पदविका, सायन्स कॉलेज व सेमी इंग्लिश स्कूल आहेत. मातोश्री शिक्षण संस्थेचे सचिव किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. संस्थेमध्ये विविध उपक्रम, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. संस्थेमध्ये अनुभवी शिक्षक, परिपूर्ण ग्रंथालय, वायफाय कॅम्पस् आहे़ पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील ज्युनिअर कॉलेज ४११ वी आणि १२ वी सायन्स़ वैशिष्ट्ये : उत्कृष्ट व तज्ज्ञ शिक्षक वृंद, प्रदूषण विरहीत कॅम्पस्, अद्ययावत ग्रंथालय, प्रयोगशाळा व सुसज्ज लॅब. जीम व स्पोर्टसाठी सर्व साहित्य व ग्राऊंड, वाय-फाय सुविधा, मेडिकल सुविधा फ्री, पर्यायी विषय आयटी व जॉगरॉफी. महाविद्यालय, विळद घाट ४बी.एस्सी. कृषी-पात्रता- १२ वी विज्ञान उत्तीर्ण़ वैशिष्ट्ये : अद्ययावत उपकरणाने सुसज्ज प्रयोगशाळा, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा, सुसज्ज ग्रंथालय, पी.एच.डी. व नेटधारक तज्ज्ञ प्राध्यापक वृंद, मुलांना स्टडी टूरची व्यवस्था, पॉलिहाऊस व शेडनेटमध्ये प्रशिक्षण व काम करण्यास संधी, जेआरएफ, एसआरएफ, एनईटी परीक्षेसाठी तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन, वर्षातून दोनदा शैक्षणिक सहल़ देसरडा-भंडारी अ‍ॅकॅडमी ४११ वी मध्ये प्रवेश घ्या आणि सीए, सीएस होऊनच बाहेर पडा. देसरडा-भंडारी अ‍ॅकॅडमीमध्ये ११ वी पासून तर सीए फायनल क्लासेस घेतले जातात. ४०० हून अधिक विद्यार्थी सी. ए. झाले आहेत. अ‍ॅकॅडमीचे वैशिष्ट्ये : २४ तास लायब्ररी सुविधा, एसी क्लास, विद्यार्थ्यांची क्लासमधील उपस्थिती-अनुपस्थिती व टेस्टच्या निकालासाठी पालकांना डेली एसएमएस अलर्ट, उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक. प. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन कॉलेज आॅफ फार्मसी, ४कोर्स- बी.फर्मासी, एम. फार्मसी, पी.एचडी. बी. फार्मसी- डिग्री कोर्स, पात्रता- १२ वी (सायन्स), एमएचटी-सीईटी, कम्पल्सरी.अत्याधुनिक सोयी-सुविधा- कॉम्प्युटर लॅब सुविधा, हॉस्पिटल सुविधा. एम. फार्मसी- (पीजी कोर्स) फार्म. केम., फार्मास्युटिकल्स, क्वालिटी अश्युरंस टेक्निक्स, फार्मेकोलॉजी. पी.एच.डी.- फार्मास्युटीकल केमिस्ट्री. श्री छत्रपती ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटशन्स, नेप्ती ४अनेक विद्यापींठाशी संलग्नित एकमेव इन्स्टीट्यूट,डिस्टन्स अ‍ॅण्ड रेग्युलर कोर्सेस एकाच ठिकाणी़ उपलब्ध कोर्सेस:बीए, बीकॉम, बी.एसस्सी., एमए. एमकॉम, एमएस्सी, एलएलबी, बीबीए, एमबीए, बीसीए, एमसीए, आयटीआय, डिप्लोमा पॉलिटेक्निक, बीटेक, एमटेक, बीलिब, एमलिब, डी फार्म, बी फार्म, बीएड, बीपीएड, अ‍ॅचिव्हमेंटआयकॉन आॅफ एज्युकेशनने सन्मानीत १००० सेंटर अख्ख्या भारतामध्ये, शाखा नागपूर, पुणे, अमरावती, खामगाव सह्याद्री व्हॅली कॉलेज, राजुरी ४मास्टर आॅफ इंजिनिअरींग,मेकॅनिकल इंजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,बॅचलर आॅफ इंजिनिअरींग, मेकॅनिकल इंजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग, कॉम्प्युटर इंजिनिअरींग, सिव्हील इंजिनिअरींग: पॉलेटेक्निक-मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजि.सह्याद्री व्हॅली कॉलेज आॅफ इंजिनिरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी हे ग्रामीण भागातील बेस्ट एमरजिंग इंजिनिअरिंग कॉलेज २०१५ आवार्ड प्राप्त झालेले आहे़ एम.आय.सी.टी.ई.डी.टी.ई व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमानुसार सुसज्ज लॅब, सेंन्ट्रल लॅब्रररी तसेच डिपार्टमेंटल लॅब्रररी, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक, मुला-मुलीसाठी स्वतंत्र वसतिगृह, प्लेसमेंटसाठी मार्गदर्शन. मराठवाडा मित्र मंडळ ग्रुप ४मराठवाडा मित्र मंडळ पुणे ही संस्था १९६७ साली भारताचे माजी गृहमंत्री कै. श्री शंकररावजी चव्हाण यांनी येथे ‘बहुजनांचे हित’ या ब्रीदवाक्याने स्थापन केली.या संस्थेअंतर्गत इंजिनिअरिंग डिग्री व डिप्लोमा, फार्मसी, लॉ, इंटेरिअर, डिझाईनिंग, आर्किटेक्चर हे कोर्सेस कर्वेनगर, लोहगाव, काळेवाडी व डेक्कन या ठिकाणी चालवले जातात. संस्थेच्या प्रत्येक कॉम्पस्मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा, वायफाय, नेटवर्क फॅसीलिटी, उच्चशिक्षित शिक्षक वर्ग, लेडीज- जेन्टस् फॉसीलिटी आहे.तसेच इंजिनिअरिंग डिग्री व डिप्लोमा कॉलेजेसचे बऱ्याच कंपन्याबरोबर एमओयुएस् झाल्यामुळे विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व प्लेसमेंट दिले जाते. संस्थेची ठळक वैशिष्टे म्हणजे कमी उत्पन्न असलेल्या होतकरू विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत व शिष्यवृत्ती दिली जाते. विश्वभारती अ‍ॅकॅडमी ४कोर्सेस -इंजिनियरींग :मेकॅनिकल,इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर, सिव्हील, मेकॅनिकल सॅँडविच पोस्ट ग्रॅड -कॉम्प्युटर, एम्बेडेड सिस्टमस् अ‍ॅण्ड व्हीलस्आय टेक्नोलॉजी, ३) मेकॅनिकल (डिझाईन)डिप्लोमा - मेकॅनिकल, सिव्हील, इलेक्ट्रीकल़सेंटर आॅफ एक्सेलन्स़ सीआयडीसी, आयबीएम, नियो, कोटेल़ आयआयटी व परदेशातील नामांकित विद्यापीठात पीएचडी झालेले अनुभवी शिक्षक, वायफाय कॅम्पस्, उत्तम प्लेसमेंट, आधुनिक लॅबरोटेरिज, होस्टेल ते कॉलेज बस सुविधा उपलब्धस्पोर्टस् आणि जिम यांची आधुनिक सोय आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल हॅण्डस आॅन एक्सपिरिएंस. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, लोणी ४प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील तंत्रनिकेतन, लोणीकॉलेज आॅफ फार्मसी, प्रवरानगर सरविश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, चिंचोली, नाशिकप्रवरा,रुरल कॉलेज आॅफ आर्किटेक्चर, लोणीवुमेन्स कॉलेज आॅफ फार्मसी, चिंचोली, नाशिक आय.टी.आय. लोणी वुमेन्स आय.टी.आय. लोणी एच.ए.एल.प्रवरा एविएशन इन्स्टिट्यूट, ओझर, नाशिक. संस्थेची वैशिष्ट्ये म्हणजे उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक व उत्कृष्ट निकालांची परंपरा आहे़ प्रदर्शनात आज काय पुणे येथील सुमन रमेश तुलसियानी व्हीआयटी संस्थेतील प्राचार्य डॉ़ अभिजित औटी यांचे ‘इंजिनिअरींग का व कसे’? या विषयावर व्याख्यान तसेच प्रा़ केदार जोशी यांचे ‘बदललेली प्रवेश प्रक्रिया’ या विषयावर सकाळी १०़३० वाजता प्रदर्शनस्थळी व्याख्यान होणार आहे़ बारावीमध्ये ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा प्रदर्शनस्थळी सायंकाळी ४ वाजता गौरव करण्यात येणार आहे़ विद्यार्थ्यांनी ९८५०२६४२०० या क्रमांकावर संपर्क साधावा प्रदर्शनात सायंकाळी ५ वाजता विखे फौंडेशनमधील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ एच़ एऩ कुदळ, उपप्राचार्य डॉ़ के़ बी़ काळे, प्रा़ एस़ एम़ मगर, डॉ़ ए़ के ़ पाटील यांचे ‘अभियांत्रिकीची बदलती प्रवेश प्रक्रिया’ या विषयावर परिचर्चा होणार आहे़

Web Title: Mantra for students choosing the right career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.