अहमदनगर : सावेडी कचरा डेपोच्या आगीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यामुळे डेपो स्थलांतरीत करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.प्रभाग 1 व 2 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगी बाबत ठेकेदारावर जवाबदारी निश्चित करून करारनामातील 34 व 37 चा भंग केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाबासाहेब गाडळकर यांनी केली.
सावेडी कचरा डेपो स्थलांतरीत करण्यासाठी मनपात राष्ट्रवादीचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 13:19 IST