कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी मनपाने केली यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:21 IST2021-05-12T04:21:56+5:302021-05-12T04:21:56+5:30
अहमदनगर: महापालिकेच्या वतीने कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांची यादी जाहीर केली जाणार असून, यादीत नाव असलेल्यांनाच ...

कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी मनपाने केली यादी जाहीर
अहमदनगर: महापालिकेच्या वतीने कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांची यादी जाहीर केली जाणार असून, यादीत नाव असलेल्यांनाच बुधवारी डोस दिला जाईल, अशी माहिती आयुक्त शंकर गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आयुक्त गोरे म्हणाले, कोविशिल्डचा दुसरा डोस बुधवारी महापालिकेच्या सातही आरोग्य केंद्रांमध्ये दिला जाणार आहे. परंतु, लसी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यामुळे पहिला डोस घेतलेल्या तारखेनुसार पात्र नागरिकांची यादी तयार करण्यात आली आहे. यादीत नाव असलेल्यांना आरोग्य केंद्रातून फोन येईल. तसेच आरोग्य केंद्राबाहेर यादी प्रसिद्ध केली जाणार असून, यादीत नाव असलेल्यांनाच फक्त दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यामुळे इतरांनी आरोग्य केंद्राबाहेर गर्दी करू नये, असे आवाहन गोरे यांनी केले.
शासनाकडून ज्या प्रमाणात लस उपलब्ध होईल, त्यानुसार प्रत्येक आरोग्य केंद्राकडून यादी तयार केली जाईल. त्यानुसार नागरिकांना फोन करून बोलावून घेतले जाईल, तेवढ्याच नागरिकांनी केंद्रात येऊन लस घ्यावी. जेणेकरून गर्दी होणार नाही. तसेच ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे राहण्याची वेळ येणार नाही, असे गोरे यांनी सांगितले.
...
प्रभागनिहाय लसीकरण केंद्र
शासनाकडून लस उपलब्ध झाल्यानंतर प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद सुरू केले जाणार असून, उपलब्धतेनुसार लस दिली जाणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू आहे. परंतु, हे केंद्र पुरेशाप्रमाणात लस उपलब्ध झाल्यानंतरच सुरू केले जातील, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.