राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी मंजुषा गुंड यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 17:11 IST2017-08-23T16:47:35+5:302017-08-23T17:11:36+5:30
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी मंजुषा गुंड यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी निवडीची नुकतीच घोषणा केली

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी मंजुषा गुंड यांची निवड
अहमदनगर : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी मंजुषा गुंड यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी निवडीची नुकतीच घोषणा केली. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचे हस्ते गुंड यांना निवडीचे पत्र देण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ गटनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, जिल्हा प्रभारी दिलीप वळसे, पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांवेळी उपस्थितीत राहणार नाही. जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात माहिती दिली आहे. मंजुषा गुंड यांनी जिल्हा परीषदेचे अध्यक्षपद भुषविले आहे. त्यामुळे पक्षाचा कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.