मांडवगण, पारगाव रस्ता होणार चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:21 IST2021-05-06T04:21:46+5:302021-05-06T04:21:46+5:30

श्रीगोंदा : तालुक्यातील श्रीगोंदा ते मांडवगण व श्रीगोंदा ते पारगाव सुद्रीक रस्ता व पेडगाव येथील पुलासाठी २३ कोटी रुपयांचा ...

Mandvagan, Pargaon road will be shiny | मांडवगण, पारगाव रस्ता होणार चकाचक

मांडवगण, पारगाव रस्ता होणार चकाचक

श्रीगोंदा : तालुक्यातील श्रीगोंदा ते मांडवगण व श्रीगोंदा ते पारगाव सुद्रीक रस्ता व पेडगाव येथील पुलासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली.

मांडवगण रस्ता दुरुस्तीसाठी केंद्रीय मार्ग निधीमधून १२ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून श्रीगोंदा ते खाकिबा देवस्थानपर्यंत काम होणार आहे. या रस्त्यावरून नगरला जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा रस्ता दुरुस्त होणे गरजेचे होते. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. निधी मंजुरीसाठीही खासदार डॉ. सुजय विखे यांनीही निधी मदत केली. त्याचबरोबर श्रीगोंदा ते पारगाव रस्त्यासाठी ४ कोटींचा निधी व पेडगाव येथील मोठ्या पुलासाठी साडेसहा कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर झाला, असेही पाचपुते यांनी सांगितले.

Web Title: Mandvagan, Pargaon road will be shiny