मनुष्याने सत्कर्माला महत्त्व द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:37 IST2021-02-06T04:37:58+5:302021-02-06T04:37:58+5:30
तालुक्यातील पढेगाव येथील नेताजी सोशल फाऊंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा रामदास महाराज यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार ...

मनुष्याने सत्कर्माला महत्त्व द्यावे
तालुक्यातील पढेगाव येथील नेताजी सोशल फाऊंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा रामदास महाराज यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. प्रदीपकुमार आहेर, भास्कर लिप्टे, डॉ. भारत काळे, डॉ. सचिन उंडे, रहेना शेख यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
रामदास महाराज म्हणाले, समाजामध्ये काम करत असताना गोरगरीब लोकांना मदत केली पाहिजे. आजचे पुरस्कारार्थी त्यांच्या विविध क्षेत्रांमध्ये समाजासाठी चांगले कार्य करीत आहेत. फाऊंडेशनच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम राबविला जातो. हे अतिशय स्तुत्य असून यामुळे पुरस्कारप्राप्त लोकांना बळ मिळते व पुन्हा काम करण्याची उमेद निर्माण होते.
यावेळी गीतकार संगीतकार विश्वनाथ ओझा यांनी भजन, गायनाद्वारे उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. फाऊंडेशनचे संस्थापक रणजित बनकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविक मधुकर बनकर यांनी केले. तर सूत्रसंचालन दयानंद शेंडगे यांनी केले.
-------