अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणा-या तरुणास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 17:22 IST2020-08-13T17:21:44+5:302020-08-13T17:22:15+5:30
एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर शारिरीक अत्याचार करणा-या एका तरुणास श्रीगोंदा पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात अटक केली आहे.

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणा-या तरुणास अटक
श्रीगोंदा : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर शारिरीक अत्याचार करणा-या एका तरुणास श्रीगोंदा पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात अटक केली आहे.
९ आॅगस्ट रोजी श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातून या अल्पवयीन मुलीचे तिच्या घरातून अपहरण झाले होते. शोधाशोध घेऊनही मुलगी न सापडल्यामुळे मुलीच्या वडिलांनी मुलीच्या अपहरणाची पोलिसांकडे तक्रार केली होती.
श्रीगोंदा पोलिसांनी कसून चौकशी केली असता तालुक्यातील एका गावात राहणाºया मुलीचा नातेवाईक असणाºया तरुणाने अपहरण केले होते. त्या दिवशी तो मुलीच्या घरी आल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यामुळे श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी संबंधित संशयित तरुणाचे मोबाईल टॉवर लोकेशन मागवले असता हा तरुण बीड जिल्ह्यातील एका गावात असल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन प्रथम मुलीची सुटका केली. यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली आहे. पोलिसांनी अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे