‘पोषण आहार’ केंद्रीय स्वयंपाकगृहामार्फत करा
By Admin | Updated: June 25, 2014 00:30 IST2014-06-24T23:32:55+5:302014-06-25T00:30:45+5:30
अहमदनगर : शालेय पोषण आहार योजना केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली मार्फत करण्यात यावी, अशी मागणी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने मनपा आयुक्त यांच्याकडे केली आहे.

‘पोषण आहार’ केंद्रीय स्वयंपाकगृहामार्फत करा
अहमदनगर : शालेय पोषण आहार योजना केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली मार्फत करण्यात यावी, अशी मागणी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने मनपा आयुक्त यांच्याकडे केली आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारने दिले होते. मात्र, प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. त्यावर न्यायालयाने केंद्रीय स्वयंपाकगृहाचा निर्णय वैध ठरविला आहे.
पोषण आहार योजनेतून मुख्याध्यापकांची मुक्तता व्हावी, या मागणीसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघाने सप्टेंबर २०१३ ला आंदोलन केले होते. याची दखल घेत शासनाने योजना राबविण्यासाठी केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली राबविण्याचे ठरविले. मात्र, या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली.
त्यावर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पोषण आहारासाठी केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली वैध ठरविली आहे. यामुळे शासनाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघाच्यावतीने सुनील पंडित यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.
याावेळी ज्ञानदेव बेरड, बाबासाहेब शिंदे, एच.सी. बनकर, संध्या कुलकर्णी उपस्थित होते.