दूध धंद्यातील लूट रोखण्यासाठी कायदे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:14 IST2021-06-19T04:14:46+5:302021-06-19T04:14:46+5:30

वैजापूर तालुक्यातील लाखगंगा गावात शुक्रवारी (दि. १८) दूध दरवाढ व इतर मागण्यांसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या ...

Make laws to prevent dairy robbery | दूध धंद्यातील लूट रोखण्यासाठी कायदे करा

दूध धंद्यातील लूट रोखण्यासाठी कायदे करा

वैजापूर तालुक्यातील लाखगंगा गावात शुक्रवारी (दि. १८) दूध दरवाढ व इतर मागण्यांसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या ग्रामसभेत नवले बोलत होते. लाखगंगा गावच्या सरपंच उज्ज्वला सचिन पडोळ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा संपन्न झाली. ग्रामसभेतील ठराव वाचन ग्रामविकास अधिकारी एस.जे. राठोड यांनी केले. या ठरावाचे सूचक राजेंद्र तुरकने, तर अनुमोदन विलास मोरे यांनी दिले. ग्रामसभेत सर्व ग्रामस्थ मिळून एकमताने दूध दरवाढ, लॉकडाऊनचा गैरफायदा घेत खासगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर १० ते १५ रुपयांनी पाडले आहेत. शेतकर्‍यांना यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे. प्रत्यक्षात मागणी किती कमी झाली व त्यामुळे दरामध्ये किती घट करणे अपेक्षित आहे याचा कुठलाही ताळमेळ स्पष्ट न करता, दूध उत्पादकांच्या असहाय्यतेचा फायदा दूध संघ व दूध कंपन्यांकडून घेतला जात आहे, अशा पार्श्वभूमीवर या लूटमारीच्या विरोधामध्ये राज्यव्यापी संघर्ष उभा करण्याची भूमिका घेत दरवाढ मिळावी, लॉकडाऊनच्या काळात दूध उत्पादकांच्या झालेल्या लुटीची चौकशी करा, दोषींवर कारवाई करा व दूध उत्पादकांची केलेली लूट वसूल करून ती परत करा, अशी लूट रोखण्यासाठी कायदे करा. ऊस धंद्याप्रमाणेच दूध व्यवसायासाठीसुद्धा एफआरपी व रेव्हेन्यू शेअरिंगचे दुहेरी संरक्षण लागू करा, दुधातील भेसळ रोखण्यासाठी कठोर पावले उचला या प्रमुख मागण्या करणारा ठराव ग्रामसभेत करण्यात आला.

राज्यव्यापी आंदोलन उभारणार, असे किसान सभेचे अजित नवले यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले. जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, बाजार समितीचे सदस्य ज्ञानेश्वर जगताप, धनंजय धोर्डे, धनंजय धनवटे, राजेंद्र कराळे, दिगंबर तुरकने, अजिनाथ तुरकने, दिलीप तुरकने उपस्थित होते.

Web Title: Make laws to prevent dairy robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.