ग्रामपंचायत बिनविरोध करा अन्‌ २५ लाख मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:45 IST2020-12-17T04:45:04+5:302020-12-17T04:45:04+5:30

पारनेर तालुक्यात ७७ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. तालुका पातळीवरील राजकारण करणारे पुढारी गावपातळीवर गटबाजी होवो अथवा हाणामाऱ्या होवोत ग्रामपंचायत ...

Make Gram Panchayat unopposed and get Rs 25 lakh | ग्रामपंचायत बिनविरोध करा अन्‌ २५ लाख मिळवा

ग्रामपंचायत बिनविरोध करा अन्‌ २५ लाख मिळवा

पारनेर तालुक्यात ७७ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. तालुका पातळीवरील राजकारण करणारे पुढारी गावपातळीवर गटबाजी होवो अथवा हाणामाऱ्या होवोत ग्रामपंचायत निवडणुकीकडे सहसा लक्ष देत नाहीत. आ. लंके यांनी मात्र गावागावातील पुढाऱ्यांना थेट आवाहन करून ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करा व गावच्या विकासासाठी २५ लाखांचा निधी घ्या, अशी साद घातली आहे. लंके सध्या अधिवेशनानिमित्त मुंबईत आहेत. तेथूनच त्यांनी बिनविरोध ग्रामपंचायतींसाठी ही घोषणा केली आहे. आतापर्यंत त्यांनी प्रमुख गावांतील गटागटांमध्ये चर्चा करून समेट घडविण्यातही यश मिळविले असून, काही मोठ्या गावांमधील निवडणुका बिनविरोध होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

याबाबत लंके म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला, त्याच वेळेपासून आपण राजकारण दूर ठेवून प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार केला. निवडणुकीत कोण बाजूने, कोण विरोधात याचा हिशेब न पाहता सर्वजण आपले आहेत. कुटुंबप्रमुख म्हणून सर्वांना एकत्र करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. विशेषतः ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे वाद होतात. त्यातून एकमेकांमध्ये कटुता निर्माण होते. दोन दिवसांच्या निवडणुकीसाठी कटुता निर्माण होऊच नये, सर्वांनी एकत्र बसून निवडणूक बिनविरोध करावी, असा माझा आग्रह असल्याचे त्यांनी सांगितले.

-----------

सरपंच ते आमदार !

आमदार लंके हे सन २००८-९ मध्ये हंगे गावचे सरपंच होते. त्यानंतर त्यांची पत्नी राणी लंके या पंचायत समितीच्या सदस्या, उपसभापती, तसेच सध्या जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. त्यामुळे गावपातळीवरील राजकारण, त्यामुळे होणारे वाद याचा मोठा अनुभव आ. लंके यांना आहे.

Web Title: Make Gram Panchayat unopposed and get Rs 25 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.