महिंद्राची माराझो साईबाबांच्या चरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 12:28 IST2019-05-25T12:27:26+5:302019-05-25T12:28:15+5:30

महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा अ‍ॅण्ड कंपनीने माराझो कार साईबांबाच्या चरणी अर्पण केली.

Mahindra's Marazo Saibaba feet | महिंद्राची माराझो साईबाबांच्या चरणी

महिंद्राची माराझो साईबाबांच्या चरणी

शिर्डी : महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा अ‍ॅण्ड कंपनीने माराझो कार साईबांबाच्या चरणी अर्पण केली. मध्यान आरतीपूर्वी कंपनीचे कार्यकारी संचालक डॉ. पवन गोयंका यांनी या कारच्या चाव्या साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या सुपूर्द केल्या.
डॉ. गोयंका व ममता गोयंका यांनी या गाडीची विधीवत पूजा केली. यावेळी कंपनीचे प्लांट हेड प्रदीप देशमुख कर्नल, सी एन बॅनर्जी, प्रशासकीय अधिकारी सूर्यभान गमित, अशोक औटी, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, वाहन विभागाचे अतुल वाघउपस्थिती होते. आजपर्यंत महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने जवळपास १४ वाहने भेट दिली आहेत.

Web Title: Mahindra's Marazo Saibaba feet