नांदूर पठारला महावृक्षारोपण उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:26 IST2021-09-17T04:26:26+5:302021-09-17T04:26:26+5:30

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील नांदूर पठार येथे वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यात शनिवारी (दि. ११) व रविवारी (दि. १२) ...

Mahavriksharopana Undertaking to Nandur Plateau | नांदूर पठारला महावृक्षारोपण उपक्रम

नांदूर पठारला महावृक्षारोपण उपक्रम

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील नांदूर पठार येथे वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यात शनिवारी (दि. ११) व रविवारी (दि. १२) महावृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. आपला गाव हिरवाईने नटलेला पाहूयात व आपल्या गावाशी, मातीशी नाळ जोडण्याची अनोखी संधी निर्माण करून वृक्षसंवर्धन संगोपनासाठी लोकसहभागातून हिरवेगार गाव अशी ओळख निर्माण करणे या उद्देशाने गावात ५३३ झाडांचे वृक्षारोपण केल्याची माहिती जन्मभूमी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद घोलप यांनी सांगितले. वटपौर्णिमेनिमित्त महिलांना आंबा, चिकू, एक फूलझाड, बकुळी, सोनचाफा, पारिजात भेट म्हणून देण्यात आली. या वेळी यशवंत महाराज मंदिरात वृक्षारोपण करताना अजय राजदेव, संजय घोलप, निवृत्ती राजदेव, जिजाराम चौधरी, रवींद्र घोलप, रमेश आग्रे, शैलेश राजदेव, भास्कर चौधरी, नांदूर पठारचे उपसरपंच सुरेश आग्रे, कार्याध्यक्ष रवींद्र पानसरे, सभासद महादू राजदेव, अजय राजदेव, प्रणव देशमाने, सोपान राजदेव, संजय देशमाने, प्रथमेश चौधरी, किरण चौधरी उपस्थित होते.

----

१६ टाकळी ढोकेश्वर

Web Title: Mahavriksharopana Undertaking to Nandur Plateau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.