महावितरणमध्ये कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन

By Admin | Updated: May 22, 2017 14:00 IST2017-05-22T14:00:42+5:302017-05-22T14:00:42+5:30

महावितरणमधील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यासाठी येथील महावितरणच्या कार्यालयासमोर कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन करुन ठिय्या दिला़

Mahavitaran's contract workers' agitation stopped | महावितरणमध्ये कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन

महावितरणमध्ये कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन

आॅनलाईन लोकमत
अहमदनगर, दि़ २२ - महावितरणमधील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यासाठी येथील महावितरणच्या कार्यालयासमोर कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन करुन ठिय्या दिला़
कंत्राटी कामगारांना कायम करुन घ्यावे, कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यात यावी, महावितरण, महानिर्मिती, महापारेषण अशा तिनही कंपन्यांमध्ये अनेक वर्षांपासून कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना शाश्वत रोजगाराची हमी मिळावी, सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करुन कामावरुन कमी केलेल्या कामगारांना तातडीने कामावर हजर करुन घ्यावे आदी मागण्या कंत्राटी कामगारांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत़ या मागण्यांच्या पुर्ततेसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे़ या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, सुदाम गायकवाड, श्रीकांत बांदल, नितीन काळे, गणेश अभंग, तात्यासाहेब गायकवाड, नवनाथ शिंदे, ज्ञानेश्वर जाधव आदींनी सहभाग घेतला़

Web Title: Mahavitaran's contract workers' agitation stopped