महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:21 IST2021-03-08T04:21:11+5:302021-03-08T04:21:11+5:30

श्रीरामपूर : शब्दालय प्रकाशन संस्थेस राज्य सरकारचा मानाचा श्री. पू. भागवत पुरस्कार हा सर्वांच्या सहकार्यातून मिळाला. त्यासाठी येथील महाराष्ट्र ...

Of Maharashtra Sahitya Parishad | महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या

श्रीरामपूर : शब्दालय प्रकाशन संस्थेस राज्य सरकारचा मानाचा श्री. पू. भागवत पुरस्कार हा सर्वांच्या सहकार्यातून मिळाला. त्यासाठी येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेने केलेला सत्कार मला मौलिक स्वरूपाचा वाटतो, असे प्रतिपादन शब्दालय प्रकाशनच्या प्रमुख सुमती लांडे यांनी केले.

सर्वोत्कृष्ट प्रकाशन कार्याबद्दल लांडे यांना नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. मसापच्या येथील शाखेच्या वतीने त्याबद्दल लांडे यांचा रविवारी सत्कार केला. यावेळी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, शाखा अध्यक्ष अविनाश आपटे, उपाध्यक्ष डॉ. बाबूराव उपाध्ये, प्रकाश कुलथे, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, विजय नगरकर, सुखदेव सुकळे, ज्येष्ठ साहित्यिक नामदेव देसाई, डॉ. कलमजीतकौर बतरा यावेळी उपस्थित होते.

यावेळी संगीता फासाटे, जया जगताप, शिवाजी चाळक, सुजाता शेडगे, रवींद्र तुपे, राखी तुपे, अशोक पिसे, पौर्णिमा पिसे, चिंतन थोरात, कांचन थोरात, रमेश जगताप, नितीन देसाई, बाळासाहेब भांड, रोहित मालकर, अशोक कटारे, शुभम केणेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Of Maharashtra Sahitya Parishad