शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

...तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी भाजपामध्ये येण्याची प्रक्रिया सुरू केली होती, राधाकृष्ण विखेंचा दावा

By अण्णा नवथर | Updated: May 5, 2024 11:56 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: बाळासाहेब थोरात यांची भाजपमध्ये येण्याची प्रक्रिया विधान परिषद निवडणुकीच्या वेळी सुरू झाली होती. त्यांची कुणासोबत बैठक झाली.  हे आपल्याला माहिती आहे. त्यांची भाजप प्रवेशाची प्रक्रिया का थांबली याचा खुलासा देखील त्यांनी करावा असे आव्हान मंत्री विखे यांनी थोरात यांना केले आहे.

- अण्णा नवथर  अहमदनगर - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विखे पिता -पुत्र काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे सूतोवाच केले. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय खळबळ उडाली असून विखे व थोरात यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. बाळासाहेब थोरात यांची भाजपमध्ये येण्याची प्रक्रिया विधान परिषद निवडणुकीच्या वेळी सुरू झाली होती. त्यांची कुणासोबत बैठक झाली.  हे आपल्याला माहिती आहे. त्यांची भाजप प्रवेशाची प्रक्रिया का थांबली याचा खुलासा देखील त्यांनी करावा असे आव्हान मंत्री विखे यांनी थोरात यांना केले आहे.

वंचितचे नेते आंबेडकर यांच्या वक्तव्याबाबत माध्यमांशी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, विखे यांची काँग्रेसमध्ये येण्यासाठीची धडपड सुरू आहे. हे माझ्याही कानावर आले आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांना सत्ता कुणाची येणार आहे, हे सर्वांपेक्षा लवकर कळते.  थोरात यांच्या या टीकेला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले,  सध्या लोकसभा च्या निवडणुका सुरू आहेत. देशातील कोणत्याही मुद्द्यावर ते बोलायला तयार नाहीत. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांची भाजपमध्ये येण्याची प्रक्रिया विधान परिषद निवडणुकीच्या वेळी सुरू झाली होती. त्यांची कुणासोबत बैठक झाली.  हे आपल्याला माहिती आहे. त्यांची भाजप प्रवेशाची प्रक्रिया का थांबली याचा खुलासा देखील त्यांनी करावा असे आव्हान मंत्री विखे यांनी थोरात यांना केले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार खेडकर यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी नगरमध्ये सभा झाली. त्यावेळी त्यांनी विखे यांच्यावर तोफ डागली. त्यांनी महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील व त्यांचे वडील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसच्या संपर्कात आहेत,असा गोप्यस्फोट केला. त्यावरून थोरात व विखे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. या संदर्भात माध्यमांशी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे यांची काँग्रेसमध्ये येण्याची धडपड सुरू असल्याची कुणकुण आपल्या कानावर आली आहे, असे सांगितले,  तर दुसरीकडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही थोरात यांची भाजपमध्ये येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. ती का थांबली याचा खुलासा त्यांनी करावा, अशी टीका केली आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४ahmednagar-pcअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४