नगरमध्ये सात नगरपरिषदेत कमळ फुलले; नेवासा नगरपरिषदेत शिंदेसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 13:27 IST2025-12-21T13:26:06+5:302025-12-21T13:27:03+5:30
Maharashtra Local Body Election Results 2025 : श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचा नगराध्यक्ष झाला आहे. संगमनेरचे नगराध्यक्ष पद राखण्यात आमदार सत्यजित तांबे यांच्या संगमनेर सेवा समितीला यश आले आहे.

नगरमध्ये सात नगरपरिषदेत कमळ फुलले; नेवासा नगरपरिषदेत शिंदेसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी
अण्णा नवथर
अहिल्यानगर: जिल्ह्यातील बारापैकी सात नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदावर भाजपने मारली आहे. शेवगाव व नेवासा नगरपरिषदेत शिंदेसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचा नगराध्यक्ष झाला आहे. संगमनेरचे नगराध्यक्ष पद राखण्यात आमदार सत्यजित तांबे यांच्या संगमनेर सेवा समितीला यश आले आहे. राहुरी नगरपरिषदेत महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष झाला आहे. कोपरगाव नगराध्यक्षपदासाठी अटीतटीची लढत झाली. अखेरच्याक्षणी भाजपचे पराग संधान ४०९ मतांनी विजयी झाले.
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये महायुतीतील शिंदेसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्वतंत्र निवडणूका लढविल्या. भाजपने सर्वाधिक सहा नगरपरिषदा ताब्यात घेतल्या असून, शिंदेसनेने नेवासा नगरपंचायत व शेवगाव नगरपरिषदेवर झेंडा फडकविला आहे. श्रीरामपूर नगरपालिकेत काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडूण आला आहे.
कुठे कुणाचा नगराध्यक्ष
जामखेड- प्रांजल चिंतामणी - भाजप
श्रीरामपूर- करण ससाणे- काँग्रेस
नेवासा- डॉ. करणसिंह घुले- शिंदेसेना
राहाता- स्वाधीन गाडेकर- भाजप
संगमनेर-डॉ. मैथिली तांबे- संगमनेर सेवा समिती
शिर्डी- जयश्री थोरात- भाजप
श्रीगोंदा- सुनिता खेतमाळीस- भाजप
पाथर्डी- अभय आव्हाड- भाजप
राहुरी- भाऊसाहेब मोरे- महाविकास आघाडी
शेवगाव- माया अरुण मुंडे- शिंदेसेना
कोपरगाव- पराग संधान- भाजप
देवळाली प्रवरा- सत्यजित कदम- भाजप