शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

आमदार सत्यजित तांबे काँग्रेसच्या व्यासपीठावर; भाषण मात्र तटस्थ, महायुतीवर टीका नाही

By अण्णा नवथर | Updated: October 30, 2024 19:05 IST

थोरात यांनी विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर जी सभा झाली त्या सभेत तांबे यांनी उपस्थिती दर्शवली.

अहिल्यानगर: नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी आपले मामा बाळासाहेब थोरात यांच्यासाठी संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या व्यासपीठावर जात भाषण दिले. मात्र या भाषणात त्यांनी महाविकास आघाडीचा पुरस्कार केला नाही किंवा महायुतीवर टीकाही केली नाही. 

संगमनेर तालुक्यात थोरात व विखे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद पेटला आहे. भाजपचे माजी खासदार डॉ .सुजय विखे यांच्या संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील सभेमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांचेबाबत वसंत देशमुख यांनी आक्षेपार्ह विधान केले. त्याचे पडसाद उमटून तालुक्यात वाहनांची जाळफोड व तोडफोड झाली. या घटनेबाबत तांबे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करताना महिलांची अवमान करण्याची संगमनेर तालुक्याची संस्कृती नाही असे म्हटले होते.  थोरात यांनी विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर जी सभा झाली त्या सभेत तांबे यांनी उपस्थिती दर्शवली. सभेत बोलताना त्यांनी संगमनेर तालुक्यातील सहकार, राजकारण व सामाजिक क्षेत्रातील संस्कृतीचा  उहापोह करताना 'आम्ही या तालुक्यात लहानाचे मोठे झालो. मात्र अशी राजकीय संस्कृती आजवर पाहिली नाही' अशा शब्दात विखे यांचेवर टीका केली.

थोरात यांना विक्रमी मतांनी विजयी करून या प्रवृत्तीला धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी केले. मात्र संगमनेर तालुक्याचे  स्थानिक संदर्भ वगळता महाविकास आघाडी व महायुतीच्या राजकारणाबाबत त्यांनी काहीही भाष्य केले नाही. सभेत व्यासपीठावरील सर्व नेत्यांनी काँग्रेसचा गमछा गळ्यात घातला होता. तांबे यांनी मात्र काँग्रेसचा गमछा घातला नव्हता. तांबे यांच्या या राजकीय तटस्थतेची चर्चा सुरू आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangamner-acसंगमनेरnorth maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसSatyajit Tambeसत्यजित तांबे