शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 15:03 IST

Maharashtra Assembly Election 2024 Congress Priyanka Gandhi : ‘जय भवानी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘साईबाबाजी की जय’ अशी घोषणा देत काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव प्रियंका गांधी भाषणाला सुरुवात केली.

शिर्डी : ‘जय भवानी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘साईबाबाजी की जय’ अशी घोषणा देत काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव प्रियंका गांधी भाषणाला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, आज येथे सभा होत आहे, त्या मैदानाजवळ साईबाबा बसत होते. आज पहिल्यांदा मला साईबाबांच्या मंदिरात जाण्याचे सौभाग्य मिळाले. आणि खरोखरच ही पवित्र भूमी असल्याची अनुभूती झाली. महाराष्ट्र सामाजिक क्रांतीची धरती आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांची ही धरती असून येथे कणाकणात सत्य, समानता, मानवता आहे. महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली. असेही त्या म्हणाल्या. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांतील महाविकास आघाडीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि.१६) राहाता तालुक्यातील साकुरी येथील दौलतबाग येथे आयोजित विजय निर्धार सभेत त्या बोलत होत्या. श्री साईबाबांची मूर्ती देत काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी गांधी यांचा सत्कार केला. व्यासपीठावर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार हेमंत ओगले, कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप वर्पे, शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी लोकसभेच्या काँग्रेस पक्षाच्या निरीक्षक राजस्थानच्या आमदार रिटा चौधरी, तेलंगाणा राज्याच्या मंत्री सीताक्का, आंबेडकरी चळवळीचे नेते बाळासाहेब गायकवाड, युवक काँग्रेसच्या संगमनेर तालुकाध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, उद्धव सेनेचे रावसाहेब खेवरे, काँग्रेसचे संगमनेर तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे आदी उपस्थित होते.  

"शिर्डी मतदारसंघात ‘दहशत से आझादी’ हवी"

शिर्डी मतदारसंघातील दहशत मोडून काढण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे. शिर्डी मतदारसंघात ‘दहशत से आझादी’ हवी आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांना आवाहन केले होते की, कोणता मतदारसंघ चांगला आहे. याची चर्चा होऊन जाऊ द्या, त्यांनी ते आवाहन स्वीकारले नाही. राज्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करायचे आहे. ज्यांना विखेंना, भारतीय जनता पक्षाला, जातीयवादाला विरोध करायचा आहे. त्यांनी शिर्डी मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांना मतदान करावे. असे आवाहन आमदार थोरात यांनी करत लाडक्या बहिणींनी महिन्याला तीन हजार रुपये देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे असे सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसshirdi-acशिर्डी