शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
5
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
6
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
7
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
8
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
9
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
10
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
11
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
12
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
13
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
14
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
15
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
16
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
17
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
18
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
19
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...

राधाकृष्ण विखे पाटलांना घेरण्याचा प्रयत्न; थोरात, कोल्हे यांच्या भूमिकेकडे लक्ष 

By अण्णा नवथर | Updated: October 30, 2024 12:05 IST

Maharashtra Assembly Election 2024 : विखे १९९५ साली पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले. यावेळी त्यांची आठवी निवडणूक आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : अहिल्यानगर :  अहमदनगर लोकसभा मतदारसंघात डाॅ. सुजय विखे यांचा पराभव झाल्यानंतर बाळासाहेब थोरात व महाविकास आघाडीच्या नेत्यांचा राधाकृष्ण विखे यांना आता शिर्डी विधानसभा मतदारसंघात रोखण्याचा प्रयत्न आहे. यावेळी विखे यांचा सामना शिर्डी मतदारसंघातील माजी आमदार चंद्रभान घोगरे यांच्या स्नुषा प्रभावती घोगरे यांच्याशी आहे. 

विखे १९९५ साली पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले. यावेळी त्यांची आठवी निवडणूक आहे. पहिली निवडणूक त्यांनी काँग्रेसकडून लढवली. नंतर शिवसेना, काँग्रेस व सध्या भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसने घोगरे यांना उमेदवारी दिली आहे. त्या विखेंच्याही नातेवाईक आहेत. विखे यांच्याकडे दीर्घ अनुभव व विकासकामांची पार्श्वभूमी आहे. घोगरे प्रभावी वक्ता व आक्रमक आहेत. त्यामुळे लढत रंगतदार झाली आहे.

थोरात, कोल्हे यांच्या भूमिकेकडे लक्ष शिर्डी मतदारसंघात संगमनेर तालुक्यातील २८ गावांतील ६७ हजार मतदान आहे. संगमनेर हा थोरातांचा तालुका आहे. कोपरगाव तालुक्यातील भाजप नेते  विवेक कोल्हे यांचा शिर्डी मतदारसंघातील गणेश कारखाना परिसरातील गावांशी संपर्क आहे. गणेश कारखाना थोरात-कोल्हे यांनी विखेंच्या विरोधात जिंकला आहे. त्यामुळे या दोन्ही भागातील मते निर्णायक आहेत.  

पुनरावृत्ती होणार ?    शिर्डीत महायुतीच्या खासदारांचा पराभव होऊन भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले. विखे यांचे विरोधक थोरात, नीलेश लंके यांनी आता शिर्डीत लक्ष केंद्रित केले आहे. ‘लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभे’तही असा त्यांचा नारा आहे. विखे विरोधक विवेक कोल्हे भाजपमध्ये आहेत. मात्र, ते विखेंना मदत करणार की तटस्थ राहणार हे स्पष्ट झालेले नाही. 

२०१९ मध्ये काय झाले?गतवेळी विखे पाटील यांनी काँग्रेसचे सुरेश जगन्नाथ थोरात यांचा ८७ हजार २४ मतांनी पराभव केला. वंचित बहुजन आघाडीचे विशाल बबन कोळगे यांना ५,७८८ मते मिळाली. 

निवडणुकीतील कळीचे मुद्देनिळवंडे धरणाच्या कामाचे श्रेय हा या मतदारसंघातील प्रमुख मुद्दा आहे. विखे, थोरात हे दोन्ही नेते या कामाचे श्रेय घेत आहेत. शिर्डीत एमआयडीसीला जागा दिली, खंडकरी शेतकऱ्यांच्या जमीनी परत केल्या, विकासाचे प्रकल्प आणले हा विखे यांच्या प्रचाराचा मुद्दा आहे. विखे दहशत करतात, चाळीस वर्षे सत्ता असताना त्यांनी काहीच केले नाही असा आरोप काँंग्रेस करत आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलshirdi-acशिर्डीnorth maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक