माळीवाडा येथील विठ्ठल मंदिरात महापौरांच्या हस्ते महापूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:15 IST2021-07-21T04:15:44+5:302021-07-21T04:15:44+5:30
अहमदनगर : आषाढी एकादशीनिमित्त माळीवाडा येथील शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर परिसरातील श्री संत सावता महाराज मंदिरातील विठ्ठल-रुख्मिणी ...

माळीवाडा येथील विठ्ठल मंदिरात महापौरांच्या हस्ते महापूजा
अहमदनगर : आषाढी एकादशीनिमित्त माळीवाडा येथील शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर परिसरातील श्री संत सावता महाराज मंदिरातील विठ्ठल-रुख्मिणी यांची महापूजा महापौर रोहिणी व संजय शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आली.
याप्रसंगी श्री. विशाल देवस्थानचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडित खरपुडे, सचिव अशोक कानडे, विश्वस्त विजय कोथिंबिरे, पांडुरंग नन्नवरे, हरिश्चंद्र गिरमे, चंद्रकांत फुलारी, बापूसाहेब एकाडे, अर्जुन बोरुडे, दत्ता जाधव, आदी उपस्थित होते. यावेळी महापौर शेंडगे म्हणाल्या, अवघा महाराष्ट्र हा विठ्ठलमय झाला आहे, पांडुरंगाने कोरोनाचे संकट दूर करून सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना विठ्ठल चरणी केली आहे. नागरिकांना सोयी-सुविधा देण्याबरोबरच नगर शहराच्या वैभवात भर पडेल, असे प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न राहील.
याप्रसंगी अॅड. अभय आगरकर म्हणाले, श्री संत सावता महाराज मंदिरातील विठ्ठल-रुख्मिणीच्या मूर्तीची पहाटेच विधिवत पूजा करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना केल्या आहेत. याप्रसंगी देवस्थानच्या वतीने महापौर शेंडगे यांचा सत्कार करण्यात आला.
-------
फोटो -२० माळीवाडा
आषाढी एकादशीनिमित्त माळीवाडा येथील शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर परिसरातील श्री संत सावता महाराज मंदिरातील विठ्ठल-रुख्मिणी यांची महापूजा महापौर रोहिणी व संजय शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी श्री विशाल देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर.