मढी देवस्थानतर्फे मुख्यमंत्री निधीसाठी २१ लाखांची मदत; मंत्री तनपुरे यांच्याकडे केला धनादेश सुपुर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 20:27 IST2020-04-05T20:25:26+5:302020-04-05T20:27:37+5:30
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २१ लाख रुपयांची मदत देण्यात आली. मदतीचा धनादेश अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून ऊर्जा व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे रविवारी (५ एप्रिल) सुपूर्द केला.

मढी देवस्थानतर्फे मुख्यमंत्री निधीसाठी २१ लाखांची मदत; मंत्री तनपुरे यांच्याकडे केला धनादेश सुपुर्द
मढी : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २१ लाख रुपयांची मदत देण्यात आली. मदतीचा धनादेश अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून ऊर्जा व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे रविवारी (५ एप्रिल) सुपूर्द केला.
यावेळी उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी येथे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून मास्क, सॅनिटायझर, वाटपासह गरजू रुग्णांना अन्नदान देवस्थानच्या वतीने वाटप केले. यावेळी अध्यक्ष शिवशंकर राजळे, कार्यकारी अधिकारी अशोक पवार, कर्मचारी अविनाश मरकड व संतोष मरकड हे उपस्थित होते.
‘सेवा परमो धर्म’ ही नाथांची शिकवण असून तीच उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना अन्नदान करून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे, असे कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी सांगितले.