लुटमार करणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:20 IST2020-12-22T04:20:18+5:302020-12-22T04:20:18+5:30
सोमनाथ रघुनाथ गोपाळ (वय २८, रा. शिर्डी), गणेश जालिंदर चव्हाण (रा. कोपरगाव), राहुल प्रभाकर गोडगे (रा. चिंचोली गुरव, ता. ...

लुटमार करणारी टोळी जेरबंद
सोमनाथ रघुनाथ गोपाळ (वय २८, रा. शिर्डी), गणेश जालिंदर चव्हाण (रा. कोपरगाव), राहुल प्रभाकर गोडगे (रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर) व रवींद्र अर्जुन तुपे (रा. शिर्डी) यांना शिर्डी परिसरातून अटक करण्यात आली. या आरोपींकडून ८५ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
या चौघांनी १२ डिसेंबर रोजी कोपरगाव येथे वाइन शॉप मालक दिलीप शंकर गौड यांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम व ४ लाख ९८ हजार ९०० रुपयांचा माल हिसकावून नेला होता. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना अटक केली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, गणेश इंगळे, सहायक फौजदार मोहन गाजरे, हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब मुळिक, भाऊसाहेब काळे, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, पोलीस नाईक शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, संतोष लोढे, दीपक शिंदे, विशाल दळवी आदींच्या पथकाने ही कारवाई केली. हे सर्व आराेपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
फोटो २१ आरोपी
ओळी- लुटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.