पेट्रोलपंपमालकास लुटले
By Admin | Updated: July 16, 2014 00:45 IST2014-07-15T23:38:30+5:302014-07-16T00:45:43+5:30
अहमदनगर : दुचाकीवरून घरी निघालेले देवरतन झंवर यांना चांदणी चौकात अज्ञात तीन जणांनी मारहाण करून त्यांच्याजवळील दोन लाख रुपये लंपास केले. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली.
पेट्रोलपंपमालकास लुटले
अहमदनगर : दुचाकीवरून घरी निघालेले देवरतन झंवर यांना चांदणी चौकात अज्ञात तीन जणांनी मारहाण करून त्यांच्याजवळील दोन लाख रुपये लंपास केले. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली.
नगरच्या चांदणी चौकातून देवरतन चांदरतन झंवर (रा. भिंगार) हे त्यांच्या दुचाकीवरून जात होते. झंवर हे इम्पिरियल चौकातील पेट्रोलपंपाचे मालक आहेत. पंपावर जमा झालेली रोख रक्कम घेऊन ते भिंगार येथील आपल्या घराकडे निघाले होते. यावेळी चांदणी चौकात अन्य एका दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांची दुचाकी झंवर यांच्या दुचाकीला आडवी लावली. तसेच झंवर यांच्या डोक्यात मारहाण केली. धमकावून झंवर यांच्याकडील २ लाख १९ हजार रुपयांची रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेतली. तसेच त्यांची दुचाकीही पळविली. मध्यरात्री झालेल्या या घटनेमुळे झंवर हे भयभीत झाले.
रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना थांबवून त्यांनी मदत मागितली. या प्रकरणी झंवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन अज्ञातांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक गांगुर्डे तपास करीत आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत चोरट्यांबाबत कोणताही शोध पोलिसांना लागलेला नव्हता.
(प्रतिनिधी)