लोकमत ‘सरपंच अवॉर्ड’चे उद्या होणार थाटात वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 13:22 IST2019-02-26T13:19:46+5:302019-02-26T13:22:20+5:30
जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ चे बुधवारी (दि. २७) अहमदनगर शहरात बंधन लॉनवर थाटात वितरण होणार आहे.

लोकमत ‘सरपंच अवॉर्ड’चे उद्या होणार थाटात वितरण
अहमदनगर: जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ चे बुधवारी (दि. २७) अहमदनगर शहरात बंधन लॉनवर थाटात वितरण होणार आहे. यावेळी ११ ते २ या वेळेत सरपंचांना विविध मान्यवरांची व्याख्याने ऐकायला मिळणार आहेत. सर्व सरपंचांसाठी हा कार्यक्रम खुला आहे.
‘लोकमत’ सरपंच अवॉर्डचे हे दुसरे वर्ष आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर केलेले आहेत. या प्रस्तावांची विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या ज्युरी मंडळामार्फत छानणीची प्रक्रिया सुरु आहे. पुरस्कार वितरणप्रसंगी आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, पुणे जिल्हा सरपंच परिषदेचे अध्यक्ष शशिकांत मोरे, राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष अनिल गिते उपस्थित राहणार आहेत. सरपंच गावासाठी काय करु शकतात? यावर हे मान्यवर सरपंच उद्बोधन करणार आहेत. गावाच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न पाहणाºया व त्या स्वप्नांना मूर्तरुप देण्यासाठी झटणाºया मेहनती व कर्तबगार विजेत्या सरपंचांना मान्यवरांच्या हस्ते अवॉर्ड प्रदान केले जातील. बीकेटी टायर्स या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक तर पतंजली आयुर्वेद सहप्रायोजक आहे.
नगरची ‘सीएसआरडी’ ही संस्थाही या आयोजनात सक्रीय आहे. या सोहळ्यास जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्रामसेवक यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
१३ विभागांमध्ये सरपंचांना पुरस्कार
सरपंचांनी गावात जल, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन - लोकसहभाग, रोजगार व कृषी या १३ कॅटेगरीत केलेल्या कामांची पाहणी करुन या प्रत्येक क्षेत्रासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय उदयोन्मुख नेतृत्व आणि सरंपच आॅफ द ईयर हे दोन पुरस्कारांचेही वितरण होईल.
वाळूचे संवर्धन करणा-या गावांचा विशेष गौरव
जिल्ह्यातील अनेक गावांनी वाळू उपशाला विरोध करुन नद्यांचे व पर्यावरणाचे संरक्षण केले आहे. राज्यासाठी ही आदर्शवत अशी बाब आहे. या गावांच्या लढाईला सलाम करण्यासाठी जिल्ह्यातील अशा निवडक गावांचा ‘लोकमत’च्या वतीने या सोहळ्यात सन्मान केला जाणार आहे.
‘बबन’ चे दिग्दर्शक साधणार सरपंचांशी संवाद
‘बबन’ आणि ‘ख्वाडा’ या चित्रपटांच्या माध्यमातून ग्रामीण जीवनावर भाष्य केलेले दिग्दर्शक भाऊराव कºहाडे हेही सरपंच अवॉर्ड सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. सरपंचांशी ते संवाद साधणार आहेत