लोकमान्य टिळक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:21 IST2021-07-28T04:21:57+5:302021-07-28T04:21:57+5:30
श्रीरामपूर : शहरातील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. अशोक साखर ...

लोकमान्य टिळक
श्रीरामपूर : शहरातील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. अशोक साखर कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष भाऊसाहेब कहांडळ यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी उपाध्यक्ष पोपटराव जाधव, प्रभारी कार्यकारी संचालक आप्पासाहेब दुशिंग, नीलेश गाडे, नारायण चौधरी, अण्णासाहेब वाकडे, विश्वनाथ लवांडे, विलास लबडे, संतोष जाधव, विक्रांत भागवत, बाबासाहेब तांबे, बाळासाहेब मेकडे, दत्तात्रय तुजारे उपस्थित होते. काँग्रेसच्या वतीने उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी पालिकेच्या टिळक वाचनालयातील त्यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले. याप्रसंगी सचिन गुजर, संजय छल्लारे, युनुस पटेल, रियाज खान पठाण, युवराज फंड, सनी मंडलिक, सुरेश दुबे, संतोष परदेसी, विशाल साळवे, मनोज बागुल, सतीश पाटणी उपस्थित होते.