शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: प्रचार लोकसभेचा, तयारी विधानसभेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 11:45 IST

युती व आघाडीच्या लोकसभा उमेदवारांचा प्रचार केला जात असला तरी त्याआड आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी तयारी चालविली आहे़

अहमदनगर : युती व आघाडीच्या लोकसभा उमेदवारांचा प्रचार केला जात असला तरी त्याआड आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी तयारी चालविली आहे़ विधानसभा मतदारसंघनिहाय होत असलेल्या बैठका, मेळाव्याांधून तालुक्यांतील विरोधकांवर टोलेबाजी करीत वातावरण निर्मिती केली जात आहे़ त्यामुळे तालुक्यातील बड्या नेत्यांच्या भाषणांची चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे़अहमदनगर लोकसभा मतदारसंघात नगर- राहुरी, शेवगाव- पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत- जामखेड, पारनेर, आणि नगर शहर, या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे़ युती व आघाडीचे उमेदवारही जाहीर झालेले आहेत़ त्यांनी प्रचारही सुरू केला आहे़ प्रचाराला येत्या १० एप्रिलनंतर वेग येणार आहे़ लोकसभेच्या उमेदवारांनी विधानसभा मतदारसंघनिहाय आजी-माजी आमदारांसह संभाव्य उमेदवारांवर प्रचाराची जबाबदारी सोपविलेली आहे़ तेही चांगलेच मैदानात उतरले आहेत़ त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांमागे चार महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका हेही एक कारण आहे़ यानिमित्ताने कार्यकर्त्यांची मोट बांधून त्यांना आतापासूनच सक्रिय करण्यावर त्यांचा भर आहे़नगर शहर विधानसभात सुजय विखे यांच्यासाठी शहर शिवसेना कामाला लागली आहे़ मागील विधानसभा निवडणूकीत ही जागा सेनेने गमावली होती़ यावेळी लोकसभेलाच शहरातून मताधिक्य घेण्याचा सेनेचा प्रयत्न असून, माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह सेनेचे आजी५माजी नगरसेवक विखे यांच्या प्रचारात सक्रिय झाल आहेत़ नगर- राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेले आहेत़ राहुरीतील राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत़ त्यांच्या उपस्थितीत उमेदवारांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे़ शेवगाव- पाथर्डीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले आघाडीच्या उमेदवारासाठी ठिकठिकाणी मेळावे घेत आहेत़ त्यांच्याविरोधात भाजपच्या आमदार मोनिका राजळे युतीच्या प्रचारासाठी सक्रिय झाल्या आहेत़श्रीगोंदा विधानसभा मतदाररसंघाचे माजी आमदार बबनराव पाचपुते युतीच्या, तर विद्यमान आमदार राहुल जगताप आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्यासाठी कामाला लागले आहेत़ कर्जत- जामखेडचे विद्यमान आमदार तथा पालकमंत्री राम शिंदेयांनी त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेठी सुरू केल्या आहेत़त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार रोहित पवार आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत़ पारनेरचे विद्यमान आमदार विजय औटी युतीच्या, तर राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार निलेश लंके व सुजित झावरे आघाडीच्या उमेदवाराचे काम करीत आहेत़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर