शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: गांधींना उमेदवारी नाकारल्यास वेगळा विचार करणार; जैन समाजाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 05:48 IST

सुजय विखे यांच्या उमेदवारीला विरोध

अहमदनगर : ज्या व्यक्तीने भाजप पक्षवाढीसाठी हयात घालवली त्यांना डावलून केवळ पैशाच्या जोरावर आयात लोकांना उमेदवारी मिळत असेल, तर याचा भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी फेरविचार करावा व नगरमध्ये दिलीप गांधी यांनाच लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी जैन समाजाने केली आहे.पत्रकार परिषदेत जैन समाजाने आपली भूमिका मांडली. गांधी हे जैन समाजाचे एकमेव खासदार आहेत. त्यांचा असलेला मोठा लोकसंपर्क व केलेली व्यापक कामे यामुळे आतापर्यंत ते तीन वेळा खासदार राहिले. त्यांना मंत्रिपदही मिळाले. २००४ मध्ये त्यांना उमेदवारी मिळाली नाही, तरी त्यांनी एकनिष्ठ राहून पक्षाचे काम केले. अशा प्रामाणिक उमेदवारांना डावलले जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही.एकवेळ पक्षातील दुसऱ्या निष्ठावंताला उमेदवारी मिळाली असती तर समजण्यासारखे होते. मात्र, सकाळ, दुपार, संध्याकाळ पक्ष बदलणाऱ्यांना भाजपने केवळ पैसा आहे म्हणून पक्षात घेतले. त्यांना उमेदवारी देण्याचे घाटत आहे. जैन समाज अशा आयात उमेदवारांना थारा देणार नाही, अशी टीका सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशावर करण्यात आली. यावेळी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तिमल मुनोत, अशोक कटारिया, जवाहर मुथा, रमेश फिरोदिया, अशोक बोरा, शैलेश मुनोत, सुभाष मुथा,अजय बोरा आदींची प्रमुख उपस्थिती होती.राष्टÑवादीत सस्पेन्स कायम नगरमधून राष्टÑवादीने उमेदवारीसाठी आमदार अरुण जगताप यांचे नाव अंतिम केल्याचे समजते. मात्र, पहिल्या यादीत पक्षाने ही उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळे उमेदवारीबाबत संभ्रम अद्यापही कायम आहे.कॉंग्रेस निरीक्षकांची नगरमध्ये बैठककॉंग्रेसचे सचिव मानसी रेड्डी यांनी बुधवार व गुरुवार नगर जिल्ह्यात बैठका घेतल्या. या बैठकीत त्यांनी कॉंग्रेसचा आढावा घेतला आहे. सुजय विखे यांच्या पक्षांतरामुळे कॉंग्रेसचे कोणते पदाधिकारी त्यांच्यासोबत जातील याचा त्यांनी आढावा घेतल्याचे समजते. कॉंग्रेसमध्ये जिल्ह्यात काही संघटनात्मक बदल होण्याचे संकेतही यातून मिळत आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Dilip Gandhiखा. दिलीप गांधीSujay Vikheसुजय विखेBJPभाजपा