शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमध्ये मतदारांवर कुणाची मात्रा; ‘आयुर्वेद’ की ‘अ‍ॅलोपॅथी’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 12:41 IST

राष्ट्रवादीने वाणिज्य विषयात पदवी मिळविणा-या आमदार संग्राम जगताप यांना तर भाजपने न्युरोसर्जन असलेल्या डॉ. सुजय विखे यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे

अण्णा नवथरअहमदनगर : राष्ट्रवादीने वाणिज्य विषयात पदवी मिळविणा-या आमदार संग्राम जगताप यांना तर भाजपने न्युरोसर्जन असलेल्या डॉ. सुजय विखे यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. त्यात संग्राम यांचे वडील आमदार अरुण जगतापही आयुर्वेद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील मतदारांवर कुणाची मात्रा लागू होणार ‘आयुर्वेद की अ‍ॅलोपॅथी’ याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे.अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आमदार संग्राम जगताप विरुध्द डॉ. सुजय विखे अशी सरळ लढत होत असली तरी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रतिष्ठेचीच ही लढाई आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे राज्याच्याच नव्हे, तर देशातील नेत्यांचे लक्ष लागून आहे. दोन्ही पक्षांनी तरुण आणि उच्च शिक्षित उमेदवार दिले आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय डॉक्टर आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांचे पुत्र संंग्राम विद्यमान आमदार आहेत. त्यांचे शिक्षण बी.कॉम. आहे.  या दोन्ही उमेदवारांच्या पदव्या पाहता ते उच्च शिक्षित आहेत. एक डॉक्टर आहे, तर दुसऱ्याने वाणिज्यमध्ये पदवी मिळविलेली आहे. डॉ. सुजय विखे यांनी मतदारसंघात अनेक आरोग्य शिबीर घेऊन मतदारांवर उपचार केलेले आहेत. हाच मुद्दा विखे प्रचारात वारंवार सांगत आहेत. त्याआधारे ते मते मागत आहेत. विखे उच्च शिक्षित आणि तरुण असल्यानेच राष्ट्रवादीनेही तरुण उमेदवाराची निवड केली आहे. डॉक्टर असलेल्या विखे यांनी मतदारसंघात अनेक राजकीय सर्जरी केल्याची चर्चा आहे़ परंतु, मतांची गोळाबेरीज करण्यात संग्राम जगताप चांगलेच पारंगत आहेत़ ते गेल्या विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत दिसले आहे़ मतांची जुळवाजुळव कशी करायची आणि जादुई आकडा कसा गाठायचा, यात त्यांचा हातखंडा आहे. पण, विखे यांनी गेल्या तीन वर्षात अनेक सर्जरी मतदारसंघात केल्या आहेत. विखे यांनी एकदा सर्जरी केली की पुन्हा दुखणे डोके वर काढत नाही, असेही अनेकांचे म्हणणे आहे.‘विखे बाहेरचे उमेदवार आहेत’, अशी टीका जगताप यांच्याकडून होऊ लागली आहे. ‘घरचा खासदार, नगरचा खासदार’, अशा पोस्ट सध्या राष्ट्रवादीकडून व्हायरल केल्या जात आहेत. त्यामुळे मतदारांना या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांनाही इलाज करावे लागतील. नगर शहरातील मतांवरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. संग्राम जगताप शहराचे आमदार आहेत. ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे त्यांच्या मतांची गोळाबेरीज नगर शहरापासूनच सुरू होते. पण, विखे उत्तरेतील असल्याने त्यांना सुरुवात कुठून करावी आणि कुठे संपवावी, असा पेच त्यांच्या समोर आहे. त्यामुळेच ते सकाळी पाथर्डीत तर दुपारी कर्जत- जामखेडमध्ये असतात़ त्यांचे वडील श्रीगोंद्यात असतात. त्यांना एकूणच कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासाठी सर्जरी करत फिरावे लागणार असल्याचे दिसते. आमदार जगताप यांचे पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेडमध्ये नातेवाईक आहेत.  त्यामुळे तिथे त्यांना गोळाबेरीज करावी लागणार आहे. इकडे शेवगावमध्ये घुले बंधुही लिड कितीचा देणार, याचा आकडा त्यांनीच आधीच सांगून टाकला आहे. त्यामुुळे मतदारांवर कोणाची मात्रा चालली, हे २३ मे रोजीच स्पष्ट होईल.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९