Lok Sabha Elecation 2019 :नगर तालुक्यातील अर्धी काँग्रेस विखेंसोबत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 13:02 IST2019-03-27T13:01:22+5:302019-03-27T13:02:55+5:30

भाजप उमेदवार डॉ. सुजय विखेंसाठी आयोजित नगर तालुक्यातील शिवसेना व काँग्रेस महाआघाडीच्या मेळाव्यात सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी हजेरी लावली.

Lok Sabha Elecation 2019: Half of the Congress Party in Nagar taluka with vikhe | Lok Sabha Elecation 2019 :नगर तालुक्यातील अर्धी काँग्रेस विखेंसोबत 

Lok Sabha Elecation 2019 :नगर तालुक्यातील अर्धी काँग्रेस विखेंसोबत 

केडगाव : भाजप उमेदवार डॉ. सुजय विखेंसाठी आयोजित नगर तालुक्यातील शिवसेना व काँग्रेस महाआघाडीच्या मेळाव्यात सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी हजेरी लावली. त्यामुळे नगर तालुक्यातील अर्धी काँग्रेस विखेंसोबत असल्याचे दिसून आले.
या काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांबाबत पक्ष काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे. या मेळाव्यास डॉ. सुजय विखे यांच्यासह प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, प्रवीण कोकाटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपत म्हस्के, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांची उपस्थिती होती. काँग्रेसचे माजी खासदार दादा पाटील शेळके, जिल्हा परिषद सदस्य प्रताप शेळके हे मात्र महाघाडीच्या मेळाव्यापासून दूरच होते. त्यामुळे तालुका काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे दिसते.

Web Title: Lok Sabha Elecation 2019: Half of the Congress Party in Nagar taluka with vikhe