आदर्श शिक्षकांची यादी गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 15:12 IST2018-08-30T15:11:12+5:302018-08-30T15:12:05+5:30
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत शिक्षकांची निवड करण्यात आली़ परंतु, शिक्षण विभागाने आदर्श पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या १४ शिक्षकांची नावे बुधवारी रात्रीपर्यंत जाहीर केली नाहीत़ आदर्श शिक्षकांच्या यादीचा घोळ जिल्हा परिषदेत दुसऱ्या दिवशी बुधवारीही सुरूच होता.

आदर्श शिक्षकांची यादी गुलदस्त्यात
अहमदनगर : आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत शिक्षकांची निवड करण्यात आली़ परंतु, शिक्षण विभागाने आदर्श पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या १४ शिक्षकांची नावे बुधवारी रात्रीपर्यंत जाहीर केली नाहीत़ आदर्श शिक्षकांच्या यादीचा घोळ जिल्हा परिषदेत दुसऱ्या दिवशी बुधवारीही सुरूच होता.
शिक्षक दिनी ५ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे़ आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते़ जिल्ह्यातून एकूण ४० शिक्षकांनी प्रस्ताव दाखल केले होते़ या शिक्षकांची परीक्षा घेण्यात आली़ शाळा परीक्षणासाठी १०० तर लेखी परीक्षेला २५ गुण होते़ त्यापैकी लेखी परीक्षा मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेत घेण्यात आली़ जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची सभा पार पडली़ या सभेत शाळा परीक्षण व लेखी परीक्षेचे गुण, याची बेरीज करून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करण्यात आली़ गतवर्षी निवड समितीच्या बैठकीनंतर आदर्श शिक्षकांची यादी प्रसिध्द करण्यात आली होती़ यासंदर्भात शिक्षण विभागाकडे विचारणा केली असता यादी अंतिम मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले़ परंतु, दुसºया दिवशी मुख्यकार्यकारी अधिकाºयांना आदर्श शिक्षकांची यादी सादर करण्यात आली़ त्यामध्ये दोन पुरस्कारांबाबत मतभेद असल्याची चर्चा होती़ त्यामुळे ही यादी अंतिम झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले़ निवड समितीच्या बैठकीनंतरही आदर्श शिक्षक पुरस्काराची यादी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली नाही़ या यादीबाबत प्रशासनाकडून कमालीची गोपनीयता पाळण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.