आयजीच्या पथकाकडून दोन लाखांची दारू जप्त; चालकाविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2023 15:30 IST2023-04-01T15:30:45+5:302023-04-01T15:30:56+5:30
याप्रकरणी टॅम्पो मालकासह हॉटेल चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयजीच्या पथकाकडून दोन लाखांची दारू जप्त; चालकाविरोधात गुन्हा दाखल
अण्णा नवथर
अहमदनगर- नाशिक येथील विशेष पोलिस महानिरिक्षक बी.जी. शेखर पाटील यांच्या पथकाने अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव ते शिर्डी रस्त्यावर बेकायदेशीरित्या विदेशी दारूची वाहतूक करणारा टॅम्पो पकडला असून, एकूण १ लाख ८६ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
याप्रकरणी टॅम्पो मालकासह हॉटेल चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पोलिस महानिरिक्षकांच्या पथकाने शनिवारी (दि. १) केली. या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे