निघोजमध्ये सव्वा लाखाचा दारूसाठा जप्त
By Admin | Updated: July 11, 2016 00:49 IST2016-07-11T00:32:23+5:302016-07-11T00:49:08+5:30
हातभट्टीवर शनिवारी सायंकाळी पारनेरचे पोलीस निरीक्षक डी. बी. पारेकर यांंच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकून सुमारे १ लाख ३० हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

निघोजमध्ये सव्वा लाखाचा दारूसाठा जप्त
निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज परिसरातील गाडीलगाव येथील नदीकिनारी झुडपात सुरु असलेल्या हातभट्टीवर शनिवारी सायंकाळी पारनेरचे पोलीस निरीक्षक डी. बी. पारेकर यांंच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकून सुमारे १ लाख ३० हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
कारवाईसाठी ६०० ते ७०० फूट बंधाऱ्याच्या झुडपात पायी जावे लागत असल्याने हातभट्टी मालक संभाजी चौगुले (रा.गाडीलगाव, ता. पारनेर) पळून जाण्यात यशस्वी झाला. यावेळी २३०० लीटरचे ४६ हजाराचे कच्चे रसायन, १८ हजार २०० रुपयांची ४५५ लीटर तयार दारु, ६६ हजार २०० रुपयांची साधनसामुग्री असा एकूण १ लाख ३० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. परंतु झुडपात हातभट्टी मालक पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलीस त्याच्या मागावर असून लवकरच अटक करण्यात येईल व निघोजमधील सर्व अवैध धंद्यांविरुध्द लवकरच मोहीम उघडणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलीस निरीक्षक डी. बी. पारेकर यांंच्या मार्गदर्शनाखाली निघोज दूरक्षेत्राचे एस. बी. लाटे, पोलीस नाईक मोरे, वडणे व सरकारी चालक शिंदे यांनी ही कारवाई केली.
(वार्ताहर)
निघोजमधील अवैध धंद्यांविरुद्ध लवकरच दारुबंदी कृती समिती मोठे आंदोलन करणार असून येथील एका हॉटेलवर चालत असलेले अवैध धंदे व एका मुलीवर झालेल्या बलात्काराचे प्रकरण दडपण्याच्या झालेल्या प्रयत्नाविरूध्दही उपोषण करणार आहोत.
-बबन कवाद,
दारुबंदी चळवळीचे प्रणेते, निघोज.