श्रीरामपूर शहरातील दारूचे दुकाने खुली; दुकानांसमोर रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 16:55 IST2020-05-13T16:54:17+5:302020-05-13T16:55:35+5:30
प्रशासनाबरोबर पंधरा दिवसांमध्ये तब्बल चार बैैठका पार पडल्यानंतर शहरातील दुकाने टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास हिरवा कंदिल मिळाला. बुधवारी शहरातील प्रतिबंधित व्यवसाय वगळून इतर दुकाने खुली झाली. दारूची दुकाने उघडल्याने मोठ्या रांगा लागल्या.

श्रीरामपूर शहरातील दारूचे दुकाने खुली; दुकानांसमोर रांगा
श्रीरामपूर : प्रशासनाबरोबर पंधरा दिवसांमध्ये तब्बल चार बैैठका पार पडल्यानंतर शहरातील दुकाने टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास हिरवा कंदिल मिळाला. बुधवारी शहरातील प्रतिबंधित व्यवसाय वगळून इतर दुकाने खुली झाली. दारूची दुकाने उघडल्याने मोठ्या रांगा लागल्या.
दीड महिन्याच्या लॉकडाऊनंतर व्यापाºयांना दिसाला मिळाला. खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींची प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत वेळोवेळी बैैठका घडवून आणल्या. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. मंत्री थोरात यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रांताधिकारी पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर प्रांताधिकाºयांनी मुख्याधिकारी समीर शेख यांना दुकाने सुरू करण्याचे आदेश दिले. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विशाल फोफळे, उपाध्यक्ष उमेश अग्रवाल, सचिव अमेय ओझा व सचिव अमोल कोते तसेच संचालक मंडळाने दुकाने खुली करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
शहरातील हॉटेल, सलून, ब्युटी पार्लर, पान स्टॉल, चहाचे हॉटेल, रसवंती, शीतपेये, भेळ, वडापावची दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली आहेत. जीवनावश्यक वस्तू व कृषी पूरक दुकाने पूर्वीप्रमाणेच खुली राहणार आहेत. दुकाने सुरू करताना सोशल डिस्टन्स, मास्कचा व सॅनिटायझरचा वापर या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी पथकासमवेत दुकानांची पाहणी करीत उपाययोजनांची पाहणी केली. एका बाजूची दुकाने आठवड्यातून प्रत्येकी तीन दिवस तर उर्वरीत दुकाने तीन दिवस खुली राहणार आहेत.