रेंगाळलेली विकास कामे पूर्ण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST2021-07-12T04:14:24+5:302021-07-12T04:14:24+5:30
श्रीरामपूर : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात ५० वर्षे रेंगाळलेली विकास कामे सुरू करण्यात आली आहेत. दिवंगत नेते जयंत ससाणे यांचे ...

रेंगाळलेली विकास कामे पूर्ण करणार
श्रीरामपूर : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात ५० वर्षे रेंगाळलेली विकास कामे सुरू करण्यात आली आहेत. दिवंगत नेते जयंत ससाणे यांचे तालुक्याच्या विकासाचे राहिलेले अधुरे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे आमदार लहू कानडे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत संक्रापूर ते लांडेवाडी या एक कोटी २५ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजनप्रसंगी आमदार कानडे बोलत होते. जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात, सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, सुधीर नवले, विष्णुपंत खंडागळे, अंकुश कानडे उपस्थित होते.
आमदार कानडे म्हणाले, नेवासा फाटा ते बाभळेश्वर या १२५ कोटी रुपये खर्चाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. मतदारसंघातील ६५ रस्त्यांच्या कामासाठी दहा लाख रुपये निधी दिलेला आहे. तालुक्यात दहा कोटी रुपयांच्या कामांची उद्घाटने करण्यात आली आहेत. कोविडकाळात २० महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. जनतेने दाखविलेल्या विश्वासाची परतफेड विकास कामांच्या रूपाने करणार आहे. यावेळी वैभव गिरमे, दवणगावचे सरपंच मेजर खपके, गंगापूरचे सरपंच सतीश खडके, ज्ञानेश्वर कोळसे, दादा महाडीक, राजू बोरुडे, सतीश विधाटे, शिवाजी होन, नबाजी जगताप, पंडित थोरात, युनूस शेख आदी उपस्थित होते.
----------
फोटो ओळी : कानडे
संक्रापूर ते लांडेवाडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना आमदार लहू कानडे.
---------