वीज तारांचा शॉक लागून तरसाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 15:07 IST2017-09-12T15:07:41+5:302017-09-12T15:07:52+5:30

टाकळी ढोकेश्वर (ता.पारनेर) येथे एस. टी. बस स्टॅन्ड जवळील अमरधामच्या शेजारील ओढ्यालगत कोंबडीचा पाठलाग करीत असताना वीज तारांचा शॉक लागून तरसाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली असल्याचे वनरक्षकांनी सांगितले.

Lightning death shock with electric shock | वीज तारांचा शॉक लागून तरसाचा मृत्यू 

वीज तारांचा शॉक लागून तरसाचा मृत्यू 

टाकळी ढोकेश्वर : टाकळी ढोकेश्वर (ता.पारनेर) येथे एस. टी. बस स्टॅन्ड जवळील अमरधामच्या शेजारील ओढ्यालगत कोंबडीचा पाठलाग करीत असताना वीज तारांचा शॉक लागून तरसाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली असल्याचे वनरक्षकांनी सांगितले.
सध्या टाकळी ढोकेश्वर परिसरात  धुमाळवस्ती व गोरडे वस्तीवर बिबट्याचे वास्तव्य असतानाच तरसाचा गावठणापर्यंत येण्याने ग्रामस्थ अचंबित झाले आहेत. तसा तरस हा एक समूह बनवून राहणारा प्राणी असून या प्राण्याचा आवाज हसल्या सारखा असतो म्हणून याला हसणारा प्राणी असे म्हणतात. तरस मांसभक्षक प्राणी असल्यामुळे मांसाच्या शोधात असताना कोंबडीचा पाठलाग करताना वीज तारा जमिनीपासून जवळच लोंबकळलेल्या असल्यामुळे विजेचा शॉक लागून तरसाचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी टाकळी ढोकेश्वर येथील वन विभागाचे वनरक्षक दिनकर मुरूमकर व वनपाल बाळासाहेब गुळवे यांनी तरसाची तपासणी करून वडगाव सावताळ येथील वनीकरणात त्याचे दफन केले.
 

Web Title: Lightning death shock with electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.